पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा तेलंगणा राज्याचा दौरा करतात, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित न राहता दांडी मारतात. अशा वेळी पंतप्रधानांचे स्वागत करण्याची जबाबदारी येऊन पडते ती कॅबिनेट मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्यावर. रविवारी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणा राज्याचा दौरा केला. त्यावेळी २०१९ पासून सलग सहाव्यांदा यादव यांनी त्यांचे स्वागत केले. येत्या काही महिन्यांत तेलंगणा राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे राज्यातील दौरे वरचेवर वाढत राहतील, असा अंदाज बांधला जात आहे.

हे वाचा >> महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा का वाढतो आहे?

Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय

पाच वेळा आमदारकी भूषवीत असलेले यादव सनथनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धव्यवसाय या खात्यांचे ते राज्यमंत्री आहेत. भारत राष्ट्र समिती पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बीआरएस सरकारच्या मेंढीवाटप योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पंतप्रधानांचे स्वागत करण्याबाबत विचारले असता, ५७ वर्षीय यादव म्हणतात की, हा केवळ शिष्टाचाराचा भाग आहे. पण, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांसमवेतचे त्यांचे संबंध आणि हिंदीवरील प्रभुत्व या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. म्हणून यादव यांचे महत्त्व अधोरेखित होते.

“जेव्हा मुख्यमंत्री उपलब्ध नसतात, तेव्हा पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची नियुक्ती केली जाते आणि दर वेळेस हे काम माझ्यावर सोपविण्यात येते. मला हैदराबादी हिंदी बोलता येते; त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या कर्मचारी, मदतनीसांशी संवाद साधण्यात मला अडचण येत नाही. तसेच पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या इतर नेत्यांशीही माझे चांगले संबंध आहेत. मला वाटते की, या सर्व बाबींमुळेच मुख्यमंत्री माझ्यावर ही जबाबदारी सोपवत असतील”, अशी प्रतिक्रिया तलासनी यादव यांनी दिली.

यादव यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदीही आता त्यांना चांगले ओळखतात. आमच्यात थोडक्यात; पण सौहार्दपूर्ण असा संवाद होतो.

हे वाचा >> तेलंगणा विधानसभा निवडणूक : BRS पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केसीआर दोन जागांवर लढणार!

“पंतप्रधान भेटल्यावर नेहमी हात मिळवतात आणि काय यादव साहेब कसे आहात आणि परिवारात कसे आहेत, असा प्रश्न विचारतात. मी उत्तर देऊन त्यांचे आभार मानतो. एकदा त्यांनी यादव समाजातील अनेकांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचेही मला सागंतिले, अशी आठवण यादव यांनी सांगितली.

रविवारी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १३,५०० कोटी रुपयांच्या अनेक योजनांचे भूमिपूजन आणि काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातील बीआरएस सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारचा भ्रष्टाचार आणि खोट्या आश्वासनामुळे तेलंगणातील जनतेला आता इथे भाजपाचे सरकार हवे आहे. तसेच घराणेशाहीमुळे बीआरएस पक्ष आणि राज्य सरकार एका कुटुंबाकडून चालवले जात आहे. सरकार एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याचीही टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

तेलंगणामध्ये भाजपाचा पाया विस्तारलेला नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ११८ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवून भाजपाने फक्त एका जागेवर विजय मिळविला होता.

यादव म्हणाले, “पंतप्रधानांशी संवाद साधला जातो त्यावेळी त्यात ते राजकारणाचा परिणाम होऊ देत नाहीत. “पंतप्रधान जाहीर सभांमधून जे बोलतात, ते राजकारण आहे आणि पण जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा राजकारण अजिबात नसते. आता तर निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सभांमधून टीका तर स्वाभाविकपणे होणारच.. हे दोन्ही बाजूंना लागू होते. आम्हीसुद्धा केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधानांवर टीका करतो.”

आणखी वाचा >> “मध्यप्रदेश, तेलंगणा अन् छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात…”, राहुल गांधी यांचं विधान

तेलगू देसम पक्षाचे (TDP) एकेकाळी नेते असणारे यादव हे काही काळपर्यंत टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय होते. १९९४, १९९९ व २००४ साली टीडीपीच्या तिकिटावर त्यांनी सिकंदराबाद येथून निवडणूक जिंकली होती. २०१४ साली टीडीपीच्या तिकिटावर त्यांनी सनथनगर येथून विजय मिळविला आणि त्यानंतर बीआरएसमध्ये प्रवेश केला. २०१८ साली पुन्हा सनथनगर येथून निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळविला. फेब्रुवारी २०१९ साली त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.