चंद्रशेखर बोबडे
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षांत काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली. पण विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, जिल्हा परिषदेतील विजयांमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या असताना पक्षाचे नागपुरातील नेते अजूनही गटबाजीतून बाहेर पडताना दिसत नाही. गुरुवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दोन गटात झालेली वादावादी ही काँग्रेसच्या ‘राडा’ संस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली आहे. पक्ष यातून कधी बाहेर पडणार, असा सवाल आता कार्यकर्ते करू लागले आहेत.
नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी नवीन नाही, यामुळे कधीकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या शहरात सध्या अस्तित्वासाठी पक्ष संघर्ष करीत आहे. पंधरा वर्षांपासून काँग्रेस महापालिकेत सत्तेबाहेर आहे. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या तरी दोन जागा केवळ पक्षांतर्गत गटबाजीमुळे गेल्या. राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळातही जिल्ह्यातील दोन मंत्र्यांची तोंडे सत्ता जाईपर्यंत परस्परांच्या विरुद्ध होती. आता लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, मात्र नेते एक व्हायला तयार नाहीत.
आणखी वाचा-पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांच्या कोल्हापूरमधील घोषणा हवेतच विरल्या
नेते एकत्र आल्यास काय होऊ शकते हे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपच्या पराभावाने सिद्ध झाले. पक्षाने एकसंघपणे निवडणुका लढवल्या तर भाजपपुढे आ्व्हान उभे केले जाऊ शकते, असे चित्र असतानाही नेते गटबाजी सोडायला तयार नाही. गुरुवारी पक्षाच्या बैठकीत झालेला गोंधळ हीच बाब अधोरेखीत करणारी आहे. खरे तर ही बैठक निवडणूक तयारीचा ठी आढावा घेण्यासाठी होती. यातून कार्यकर्त्यांपर्यंत एकीचा संदेश जाणे अपेक्षित असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि त्यांचे पारंपरिक पक्षांतर्गत विरोधक नरेंद्र जिचकार हे दोन गट परस्परांशी भिडले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा वाद झाला. त्यांचे नेत्यांवर नियंत्रण नाही, असा संदेश या बैठकीतून कार्यकर्त्यांना गेला.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या कार्यशैलीवर शहरातील एक गट नाराज आहे, त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी हा गट नेहमी लावून धरतो. या बैठकीतही गोंधळास हाच मुद्दा कारणीभूत ठरला. आपण राजीनामा दिला आहे, पक्षानेच या पदावर कायम राहण्यास सांगितले,असा ठाकरेंचा दावा आहे. ठाकरेंचा राजीनामा मागणारे जिचकार यांच्याकडून यापूर्वी शिस्त मोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. पक्षाच्या शहर अध्यक्षाला ठेवावे की काढावे याची मागणी वेगळ्या व्यासपीठावर करता आली असती व गोंधळ टाळता आलाअसता. जिचकार यांनी कोणाच्या सूचनेवरून बैठकीत आक्रमक भूमिका घेतली, असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहे.
“ पक्षात वाद नाही, किंवा बैठकीत गोंधळही झाला नाही, ज्यांनी शिस्त मोडली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” -नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस