विष्णू देव साय यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथग्रहण समारंभ पार पडला. त्यासह छत्तीसगड राज्यासाठी अरुण साव, तसेच विजय शर्मा या दोन नेत्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण साव हे ओबीसी समाजातून येतात; तर विजय शर्मा हे छत्तीसगडमधील हिंदुत्वाचा चेहरा मानले जात आहेत. आगामी लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. हीच निवडणूक लक्षात घेता, ओबीसी तसेच हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

विष्णू देव साय यांची मुख्यमंत्री म्हणून निवड

विष्णू देव साय यांची १० डिसेंबर रोजी छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र, तोपर्यंत शर्मा आणि साव यांची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा झालेली नव्हती. विशेष म्हणजे शपथविधी पार पडेपर्यंत हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करण्यात आली नव्हती.

Revenue Minister Chandrasekhar Bawankule said amending Revenue Act for societys poorest is necessary
नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Sudhir Mungantiwar on ministerial post
Sudhir Mungantiwar: ‘शपथविधी सोहळा होईपर्यंत माझं नाव यादीत होतं’ मंत्रिपदाबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
Bhandara District Minister, Raju Karemore,
राज्याला पहिले उपमुख्यमंत्री देणारा भंडारा जिल्हा मंत्रिपदापासून वंचितच!
Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi
भूतकाळात नव्हे वर्तमानात वावरा! खरगे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला
News About Hasan Mushrif
Hasan Mushrif : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले एकमेव मुस्लिम मंत्री हसन मुश्रीफ कोण आहेत?
Laxman Hake, Chhagan Bhujbal And Ajit Pawar.
Chhagan Bhujbal : भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना सवाल
Ravindra Chavan supporters are upset because they did not get the ministerial post print poltics news
रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी

अरुण साव कोण आहेत?

अरुण साव हे सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते साहू (तेली) या समाजातून येत असून, ओबीसी प्रवर्गात मोडतात. ते अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते होते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये भाजपाने त्यांच्यावर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली.

दरम्यानच्या काळात साव हे काँग्रेसवर सतत टीका करायचे. गेल्या काही काळात नक्षलवाद्यांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप साव यांनी केला होता. विशेष म्हणजे हा मुद्दा त्यांनी थेट संसदेतही उपस्थित केला होता. मुंगेली येथे साव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अभयराम साव हे संघाचे वरिष्ठ पदाधिकारी होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत साव हेदेखील संघाशी पर्यायाने भाजपाशी जोडले गेले.

… तरी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम

आपल्या कारकिर्दीत त्यांना भाजपा पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत वरिष्ठ पदावर होते. तरीदेखील एक बूथ पातळीवरचा कार्यकर्ता म्हणून ते काम करीत राहिले. काही काळानंतर त्यांची भाजपाशी संबंधित असलेल्या बीजेवायएम या तरुणांच्या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२०१९ साली लढवली लोकसभेची निवडणूक

साव हे २०१९ साली प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले. त्यांनी २०१९ साली बिलासपूर या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत काँग्रेसचे उमेदवार अटल श्रीवास्तव यांना १.४ लाख मतांनी पराभूत केले होते. निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रानुसार साव यांच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे एकूण १.६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

भाजपाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण चार खासदारांना तिकीट दिले होते. साव त्यापैकीच एक आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार ठाणेश्वर साहू यांना ४५ हजार मतांनी पराभूत केले आहे.

विजय शर्मा कोण आहेत?

विजय शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. छत्तीसगडमध्ये ते भाजपाचा हिंदुत्वाचा चेहरा ठरू शकतात. २०२१ सालच्या जातीय दंगलीत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ते काही दिवस न्यायालयीन कोठडीत होते. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपाने कावर्धा मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहमम्द अकबर यांना ३० हजार मतांनी पराभूत केले होते. अकबर यांनी २०१८ साली या जागेवर तब्बल ५९ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

अकबर यांच्यावर केली होती टीका

निवडणुकीपूर्वी शर्मा यांनी अकबर यांच्यावर सडकून टीका केली होती. “अकबर यांच्या राजकारणामुळे कावर्धा मतदारसंघातील लोक घाबरले आहेत. काँग्रेसने कायद्याचा गैरवापर केलेला आहे. लोकांनी मला फोन कॉल करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले आहे. ही निवडणूक म्हणजे आत्मसन्मान आणि दहशतवाद संपवण्यासाठीची लढाई आहे. या मतदारसंघातील लोकांनी कधीही अश्रुधूर, कर्फ्यू कधीही पाहिलेला नाही. अनेक लोक तुरुंगात गेले आहेत,” असे शर्मा म्हणाले होते.

१९८९ साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात

शर्मा यांनी मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. १९८९ साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. ते १९८९ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. पुढे त्यांची बीजेवायएमचे राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. २०२० साली ते कबीरधाम येथून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.

तीन महाविद्यालयांत प्राध्यापक

आतापर्यंत त्यांनी तीन महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तसेच दोन टेलिकॉम सेक्टरच्या कंपन्यात त्यांनी नोकरी केलेली आहे. त्यांनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत भाग घेतलेला असून, ते आवड म्हणून कविताही करतात.

Story img Loader