मंगळवारी (२७ फेब्रुवारी) कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने तीन; तर भाजपाने एका जागेवर विजय मिळविला. या विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या अजय मांकन, नासिर हुसैन, जी. सी. चंद्रशेखर यांचा समावेश होता. तसेच भाजपाचे नारायण बंदिगेदेखील या निवडणुकीत विजयी झाले. तर, जेडीएसच्या कुपेंद्र रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या निवडणुकीत अजय मांकन, नासिर हुसैन व जी. सी. चंद्रशेखर यांना मिळून काँग्रेसला १३९, भाजपाला ४८, तर जेडीएससला ३५ मते मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचेही बघायला मिळाले. भाजपाचे यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी क्रॉस व्होट केले; तर येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर यांनी मतदानात सहभाग न घेतल्याने एक प्रकारे काँग्रेसला मदतच झाली. दरम्यान, या निवडणुकीत ज्या दोन आमदारांमुळे भाजपाला नाचक्की सहन करावी लागली, ते दोन आमदार नेमके कोण आहेत? जाणून घेऊ.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

हेही वाचा – पसमांदा मुस्लीम संघटनेच्या अहवालात भाजपावर टीका; समुदायाला खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याची मागणी

दोन्ही आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसी

खरे तर एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर हे भाजपाचे दोन्ही आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसी होते. २०१९ मध्ये काँग्रेसमधून ज्या आमदारांनी भाजपात प्रवेश केला, त्या आमदारांच्या गटात एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर यांचाही समावेश होता. त्यामुळेच कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएसचे युतीचे सरकार कोसळले होते.

कोण आहेत एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर?

आमदार एस. टी. सोमशेखर (वय ६६) हे रिअल इस्टेट आणि ट्रॅव्हल व्यवसायात आहेत. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये त्यांनी बंगळुरू विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच ते बी. एस. येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रीही होते. एकेकाळी सिद्धरमैय्या यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे एस. टी. सोमशेकर आता डी. के. शिवकुमार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी डी. के. शिवकुमार यांच्याबरोबर विमान प्रवासही केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे ते परत काँग्रेसमध्ये येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. अशातच आता त्यांना बंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

त्याशिवाय भाजपाचे आमदार शिवराम हेब्बर सुपारी लागवडीच्या व्यवसायात आहेत. ते येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. तसेच त्यांनी येडियुरप्पा व बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री म्हणून काम केले. मागील काही दिवसांत ते भाजपात नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, याबाबतचे कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही.

हेही वाचा – Loksabha Election: बारामुल्लामधून पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सज्जाद लोन?

एस. टी. सोमशेखर यांच्याबरोबरच शिवराम हेब्बर हेदेखील काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर कन्नड मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शिवराम हेब्बर यांनी १९८३ मध्ये येल्लापूर एपीएमसीची निवडणूक लढवीत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. २००८ मध्ये त्यांनी येल्लापूर-मुंदगोड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या व्ही. एस. पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.

Story img Loader