छत्रपती संभाजीनगर : आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरण त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई, बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरावर आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून एकवटलेला ओबीसी मतदार दुसऱ्या बाजूला, असे निवडणुकीतील पारंपरिक जातीय प्रारुप या वेळी बीड लोकसभा मतदारसंघात पुन्हा रंगले आहे. त्यात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी आणि जात केंद्रीत अधिक अशीच होत आहे.

लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यातील सर्वाधिक ४१ उमेदवार बीडमध्ये. त्यातील १८ उमेदवार मुस्लिम. पाच उमेदवार मराठा, त्यामुळे मतांची वजाबाकी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न दिसून येतो आहे. त्यात मतदान यंत्रामध्ये एक नवा संभ्रम आहे तो तुतारीवाला माणूस आणि तुतारी या चिन्हामध्ये या दोन चिन्हांचा क्रम ठरवताना फक्त बसपाचा हत्ती हे चिन्ह मध्ये आहे. निवडणुकीतील हे बारकावे एका बाजूला दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अंबाजाेगाईमध्ये होत आहे. जातीय समीकरणात एकवटण्याचा उच्च टोकावर मराठा आणि ओबीसी पोहचले असल्याने निवडणुकीनंतर उसवलेली सामाजिक वीण दुरुस्त करणे अवघड होऊन बसेल असे वातावरण गावोगावी निर्माण झाले आहे. मतदारसंघनिहाय आता बेरजा- वजाबाक्या सुरू झाल्या आहेत.

hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
Himanta Biswa Sarma
“झारखंडमध्ये मुस्लिमांची संख्या वाढत आहे, कारण…”; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा?
India-Canada Conflict United States reacts
India Canada Row: खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल; म्हणाले, “चिंताजनक…”
Vijay Thalapathy political party TVK rally
Actor Vijay: थलपती विजयच्या राजकीय एंट्रीमुळे तमिळनाडूमधील प्रस्थापित बुचकळ्यात; द्रमुक, भाजपाचा सावध पवित्रा
lawrence bishnoi interview
पोलीस स्टेशन नव्हे, लॉरेन्स बिश्नोईचा स्टुडिओ? उच्च न्यायालयानं पोलिसांना घेतलं फैलावर!
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लीम फक्त मतदानासाठी; उमेदवारी कुणालाच नाही, का झालं असं?

भाजपामधील अतर्गंत कुरबुरीतून नाराज असल्याचे संदेश वारंवार देणाऱ्या पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक समाज पक्षाचे महादेव जानकर यांना भाजपने उमेदवारी दिली. रोष व्यक्त करणारे भाजपातील चेहरे कामाला लागले. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर भाऊ धनंजय मुंडे बहिणी पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले. त्यामुळे परळीचे मतदार कोंडीतून बाहेर आले. आता या विधानसभा मतदारसंघात सारे काही कमळाभोवती असे वातावरण आहे. केज हा पट्टा बजरंग साेनवणे यांचा. या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे उसाचे राजकारण या भागात प्रभावी ठरेल. तसेच जातीची तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकली आहे. त्याचा परिणाम आंतरवली सराटीला जवळ असणाऱ्या गेवराई, माजलगाव या पट्टयात अधिक असू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांचे गावोगावी मोठे स्वागत केले आहे. जसाजसा मराठा समाजातील जोष वाढतो आहे तसतसे ओबीसी मतांचे ध्रुवीकरणही होत आहे. बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावे व त्यांची जात हा ज्याच्या त्याच्या तोंडी असणारा विषय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याशिवाय माळी, धनगर किंवा इतर मागास वर्गीयांमधील अन्य प्रभावी उमेदवार रिंगणात नाही, हे आवर्जून सांगितले जात आहे. दुसरीकडे आता महायुतीचे नेते एकवटले आहेत. पण नेत्यांना रोषाला सामाेरे जावे लागत आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांना माजलगाव तालुक्यातील लऊळ या गावी आरक्षण आंदोलक समर्थकांनी घेराव घातला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा कारखाना असणाऱ्या केज तालुक्यातील औरंगपूर गावातही पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तत्पूर्वी शिरूर तालुक्यातील खालापुरी गावात त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला होता. याशिवाय प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांनाही आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रचार करताना थांबवले होते. महायुतीमधील नेते एकवटले असले तरी त्यांना रोषाचा सामना करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला मतांची गोळाबेरीज करणारे व्यवस्थापन करू शकणारी मंडळी महायुतीच्या बाजूने आहे. यामध्ये सुरेश धस, बाळासाहेब आसबे, अमरसिंह पंडीत, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांच्यासह धनंजय मुंडे ही मंडळी पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभी आहे. तर बजरंग सोनवणे यांच्या बाजूने आमदार संदीप क्षीरसागर आणि नव्याने शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले सुरेश नवले दिसत आहेत.

हेही वाचा : नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?

दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व असणाऱ्या काळापासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्याविरोधात उभे ठाकणारा मराठा समाजही आता ताकदीने उतरला आहे. दुसरीकडे ओबीसी मतदारांमध्येही अस्वस्थता आहे ती नेतृत्वाला आव्हान असण्याची. गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असताना पंकजा मुंडे यांना सत्तेतील कोणतेही पद देण्यात आले नव्हते. आता जर नेतृत्व उभे करायचे असेल तर ही निवडणूक ‘ प्रतिष्ठे’ची करण्याशिवाय पर्याय नसल्याचीही भावना ‘ओबीसी’ मध्ये दाटलेली आहे. आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटावर कोण सरस ठरणार याची उत्तरे निकालानंतरच मिळतील पण राष्ट्रीय मुद्दे प्रभावहीन ठरतील, असेच चि़त्र बीडच्या प्रचारात दिसून येत आहेत.

बीड लाेकसभा मतदारसंघात ५५ उमेदवारांचे ९९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. यातील आठ उमदेवारांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत. २७ जणांचे अर्ज नाकारण्यात आले आणि १७ जणांनी अर्ज मागे घेतले.

हेही वाचा : मुस्लिमांनी मतदान केले म्हणूनच योगी आदित्यनाथ दोनदा मुख्यमंत्री; टीडीपीच्या उमेदवाराचे वक्तव्य

ओबीसी विरुद्ध मराठा की ओबीसी विरुद्ध ओबीसी ?

सकृत दर्शनी बीडची लढाई मराठा विरुद्ध ओबीसी अशी असली तरी बजरंग सोनवणे यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यामुळे तेही ओबीसी आहेत. त्यामुळे आता लढा मराठा विरुद्ध ओबीसी कसा असा सवाल धनंजय मुंडे प्रचारा दरम्यान विचारत आहेत. विविध ठिकाणी बैठका घेत मराठा समाजातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना ते आश्वासने देत आहेत.

Story img Loader