IAS officer Sanjay Prasad : उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून गुरुवारी (२ डिसेंबर) रात्री उशिरा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये आयएएस अधिकारी संजय प्रसाद यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आलं आहे. १९९५ च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले संजय प्रसाद हे सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्याकडे नव्याने गृह, व्हिजिलन्स, पासपोर्ट आणि व्हिसा यासारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सहा वेगवेगळ्या राज्यांमधील गृहसचिवाच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये संजय प्रसाद यांचाही समावेश होता.

कोण आहेत आयएएस अधिकारी संजय प्रसाद?

लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने संजय प्रसाद यांची पुन्हा एकदा गृहसचिव पदावर नियुक्ती केली आहे. संजय प्रसाद हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सर्वात विश्वासू अधिकारी मानले जातात. मुख्यमंत्र्यांचा राज्याबाहेरचा दौरा असला की, प्रोटोकॉलचे प्रभारी म्हणून संजय प्रसाद त्यांच्याबरोबर राहतात. मूळचे बिहारचे असलेले संजय प्रसाद यांची १९९९ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर ओळख झाली होती, त्यावेळी ते गोरखपूर येथे मुख्य विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Delhi Elections 2025:
Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभेची रणधुमाळी; मुख्यमंत्री आतिशींच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या अलका लांबा कोण आहेत?
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
ujjwal nikam on beed sarpanch murder
Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा युक्तिवाद उज्ज्वल निकम करणार; लोकसभेच्या पराभवानंतर निकम पुन्हा चर्चेत कसे आले?
उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात अशा चर्चा का सुरू झाल्या? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?
Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
five maha yuti MLA Sangli district minsitership post
पाच आमदारांचे बळ देऊनही सांगली जिल्हा ‘पोरका’
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे

हेही वाचा : Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?

१९९९ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर ओळख

योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी संजय प्रसाद हे २००२ ते २००३ या कालावधीत महाराजगंजचे जिल्हा दंडाधिकारी होते. त्यानंतर अयोध्या, बहराइच, फिरोजाबाद आणि आग्रा जिल्ह्यांचे दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे सरकार असताना संजय प्रसाद वरिष्ठ पदांवर कार्यरत होते. २००९ मध्ये मुख्यमंत्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रसाद यांची गृह विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात गृहसचिवपदाची जबाबदारी

D

२०१४ मध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. संजय प्रसाद यांच्याकडे त्यावेळीही गृहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. जवळपास सहा महिने त्यांनी या पदावर काम केले. यानंतर प्रसाद यांनी उद्योग, आयटी, कारागृह, वैद्यकीय आणि आरोग्य यासारख्या विभागांची जबाबदारी सांभाळली. २०१५ मध्ये केंद्र सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सहसचिव पदावर त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर २०१९ पर्यंत संजय प्रसाद यांनी संरक्षण विभागात सहसचिव म्हणून काम केले.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी संजय प्रसाद यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्यात परत आणलं. तसंच काही काळासाठी त्यांच्याकडे पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली. सहा महिन्यांनंतर, सप्टेंबर २०१९ मध्ये संजय प्रसाद यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव म्हणून करण्यात आली. तेव्हापासून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रधान सचिव म्हणून ते काम पाहत आहेत.

हेही वाचा : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?

संजय प्रसाद यांचा प्रभाव कसा वाढत गेला?

२०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वात प्रभावशाली अधिकारी अवनीश कुमार यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यातच अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत कुमार सेहगल यांची माहिती व जनसंपर्क विभागातून बदली झाल्यामुळे संजय प्रसाद यांचा प्रशासकीय यंत्रणेवरील प्रभाव आणखीच वाढला. १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसाद यांना माहिती विभागासह गृह, व्हिजिलन्स, पासपोर्ट आणि व्हिसा, तुरुंग, ऊर्जा या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर झाली होती बदली

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लोकसभा निवडणुकीआधी संजय प्रसाद यांच्याकडून गृह आणि दक्षता विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली. योगी आदित्यनाथ सरकारला बसलेला हा मोठा धक्का मानला जात होता. संजय प्रसाद यांना या पदावर कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. परंतु, निवडणूक आयोगाने सरकारचे म्हणणे बिलकूल ऐकून घेतले नाही. अनेकांनी त्यावेळी आरोप केला की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळेच संजय प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे.

संजय प्रसाद यांच्याकडे महत्वाची जबाबदारी का देण्यात आली?

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा एकदा संजय प्रसाद यांच्याकडे गृहसचिवपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील त्यांचं स्थान अधिकच भक्कम झालं आहे. मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “संजय प्रसाद यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते नेहमी सावध राहतात आणि परिस्थितीवर तत्काळ प्रतिक्रिया देतात, जे त्यांच्या पदासाठी आवश्यक आहे.”

Story img Loader