रामनवमीच्या दिवशी देशाच्या अनेक राज्यांतील विविध ठिकाणी हिंसाचार आणि सांप्रदायिक तणाव उफाळून आलेला पाहायला मिळाला. या अप्रिय घटनांविरोधात त्या त्या राज्यात पोलीस कारवाई करीत आहेत. गुजरातमधील उना येथेदेखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे रामनवमीनिमित्त (दि. ३० मार्च) रोजी निघालेल्या मिरवणुकीत हिंदुत्ववादी कार्यकर्ती काजल सिंगाला (Kajal Shingala) ऊर्फ काजल हिंदुस्थानी (Kajal Hindusthani) हिच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा (१ एप्रिल) दाखल करण्यात आला आहे. काजलच्या भाषणानंतर दोन गट आपापसात भिडले होते. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून ७५ लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

काजल हिंदुस्थानी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले तरी अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. २ एप्रिल रोजी काजलने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ट्वीट टाकत, दिल्ली येथे होणाऱ्या हिंदू जागृती संमेलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केलेले होते.

bjp kirit Somaiya
“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
sanjay mone write a post for amit thackeray
संजय मोनेंची अमित ठाकरेंसाठी खास पोस्ट, ‘राज’पुत्राला मत देण्यासाठी सांगितले ‘हे’ १० मुद्दे
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
sada sarvankar and Raj Thackeray
Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं वक्तव्य, “राज ठाकरेंच्या मनात काय ते मला..”

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना १ एप्रिल रोजी गिरचे पोलीस अधीक्षक श्रीपाल शेषमा यांनी सांगितले, “काजल हिंदुस्थानी हिच्याविरोधात चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी उना पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्यांचा दंगलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगलखोरांच्या दोन्ही गटांमधून ६० लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. चित्रीकरण तपासून आणखी काही लोकांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जशी माहिती मिळत जाईल, तसे आणखी लोकांना ताब्यात घेऊ. काजल हिंदुस्थानी तिच्या घरी आढळली नाही, तिचा तपास आम्ही करीत आहोत.”

पुन्हा ३ एप्रिल रोजी शेषमा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. काजलचा शोध सुरू असून एक दोन दिवसांत तिलाही अटक करू. तिच्यावर एफआयआर दाखल झाला तेव्हा ती दिल्ली किंवा नोएडा येथे असल्याचे कळले. जामनगर येथील तिच्या निवासस्थानी आमचे पथक लक्ष ठेवून आहे.

कोण आहे काजल हिंदुस्थानी?

४० वर्षीय काजल मूळची राजस्थानची आहे. लग्नाच्या आधी तिचे नाव काजल त्रिवेदी होते. जामनगर येथील व्यावसायिक ज्वलंत सिंगाला यांच्याशी तिचा दोन दशकांपूर्वी विवाह झाला. तिच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार तिने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासाठी कोटा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रचार केलेला आहे. तिच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फॉलो करण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५-१६ च्या दरम्यान काजलने सोशल मीडियावर सक्रिय होण्यास सुरुवात केली. यूट्यूबवर विविध विषयांवर भूमिका मांडणारे व्हिडीओ तिच्याकडून अपलोड करण्यात येतात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत असताना सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स निर्माण झाले. कालांतराने व्हीएचपीच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना काजलची उपस्थिती वाढली.

विश्व हिंदू परिषदेने हात झटकले!

उना येथे काजलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र विश्व हिंदू परिषदेने तिचा संघटनेशी संबंध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. संघटनेचे प्रवक्ते हितेंद्र राजपूत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमाला आम्ही तिला निमंत्रित केलेले नव्हते. तपास अधिकारी गोस्वामी यांनी सांगितले की, काजलने उना शहराच्या त्रिकोन बाग येथे कथित चिथावणीखोर भाषण दिले. गुजरातमध्ये आतापर्यंत तिच्याविरोधात एकही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र कर्नाटकच्या उडुपी येथे २०२२ साली अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला असल्याचे समोर आले.

ऑनलाइन लिखाणावरून काजलला धमक्या

काजल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्यामुळे तिला अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. २०१७ साली जामनगरमधील भाजपाच्या नेत्याने या धमक्याप्रकरणी तिला जामनगरच्या पोलिसांकडून मदत दिली होती. नाव न उघड करण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितले की, सार्वजनिक मंचावर बोलत असताना काजल धाडसी वृत्ती दाखवते. सोशल मीडियाचा वापर करून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एनजीओ किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन तिने सोशल मीडियाद्वारे उल्लेखनीय जनसंपर्क साधला आहे.

काजल स्वतःला “आर्य वीरा”, सामाजिक कार्यकर्ती आणि हिंदुस्थानी असल्याचे सांगते. तिच्या इन्स्टाग्रामवर हे लिहिले आहे. तर ट्विटरवर तिने स्वतःचे नाव काजल हिंदुस्थानी लिहिले असून त्यात ती स्वतःला नवउद्योजक, संशोधक, वक्ता, सामाजिक कार्यकर्ती, राष्ट्रवादी आणि हिंदुस्थानी म्हणवून घेते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट व्हीएचपी, बजरंग दल आणि ब्रह्मकुमारीज् यांच्याशी संबंधित असतात. ख्रिश्चन आणि मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात विविध विषयांवर ती लिहीत असते. जसे की, आंतरधर्मीय विवाह, श्रद्धा वालकर यासारखे प्रकरण, तुनिषा शर्मा आत्महत्या आणि स्वरा भास्कर हिचा मुस्लीम व्यक्तीशी विवाह अशा विषयांवर मत मांडण्याची संधी ती सोडत नाही.

उद्धव ठाकरेंचा सोशल मीडियातून विरोध

भाजपाच्या विरोधात असणारे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्याही अनेक पोस्ट तिने लिहिल्या आहेत. मुंबईत २०२२ साली नवनीत राणा आणि रवि राणा यांचे हनुमान चालिसाचे प्रकरण गाजले. या प्रकरणात तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या विरोधात अनेक पोस्ट टाकल्या होत्या. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाच्या विरोधातही ती अनेक पोस्ट अपलोड करत असते.

लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या महिलांना वाचवणे आणि पाकिस्तानी हिंदूंना गुजरातमध्ये स्थान देणे, अशा दोन चळवळी चालवण्यासाठी काजल कार्यरत असल्याचाही दावा तिच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे