Mohan Singh Bisht: दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते मोहन सिंह बिश्त यांचा मतदारसंघ बदलून त्यांना मुस्लिमबहुल अशा मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघात उभे केले होते. याठिकाणी त्यांनी मोठा विजय मिळविला आहे. बिश्त हे करवाल नगर विधानसभेचे विद्यमान आमदार होते. पण त्यांना मुस्तफाबाद येथून तिकीट देण्यात आले. तसेच त्यांच्या जागी करवाल नगरमध्ये कपिल मिश्रा यांना उमेदवारी दिली गेली. बिश्त यांनी मुस्तफाबादमधून ४० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला.

मुस्तफाबादमध्ये ३९.५ टक्के मुस्लीम मतदारांची संख्या आहे. आम आदमी पक्षाचे नगरसेवक आणि २०२० सालच्या दंगलीतील आरोपी ताहीर हुसैन यांना एमआयएम पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला होता. ‘आप’ने अदील अहमद खान यांना उमेदवारी दिली होती. मुस्तफाबाद हा ईशान्य दिल्लीतील मतदारसंघ असून २०२० साली याठिकाणी उसळलेल्या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता.

AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 LIVE : दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी विजयी; भाजपाच्या रमेश बिदुरींचा केला इतक्या मतांनी पराभव!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi Assembly Election 2025 Live Results- Party-wise Seat Count & Winners in Marathi
Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; दिल्लीकरांना दिली ‘ही’ गॅरंटी!
Swati Maliwal
Arvind Kejriwal Lost : “अहंकार रावण का भी नहीं बचा था…”, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर, ‘आप’च्याच खासदाराची पोस्ट व्हायरल
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
amitabh bachchan says time to go
“जाण्याची वेळ झाली…”, अमिताभ बच्चन यांची पोस्ट
AAP Leader Arvind Kejriwal defeated by BJP Parvesh Sharma
Arvind Kejriwal Election Result : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; अरविंद केजरीवाल यांचा पराभव
Arvind Kejriwal
Delhi Assembly Election 2025 Results Update : अर्थसंकल्पातील ‘त्या’ घोषणेमुळे दिल्लीत निकाल फिरले? ‘आप’ला नेमका कशाचा बसला फटका?

मोहन सिंह बिश्त कोण आहेत?

मोहन सिंह बिश्त हे भाजपाचे मोठे नेते आहेत. १९९८ साली करवाल नगरमधून त्यांचा पहिल्यांदा विजय झाला होता. २०१५ सालापर्यंत त्यांनी हा मतदारसंघ राखला. २०१५ साली ते मिश्रा यांच्याकडून पराभूत झाले. त्यानतंर २०२० साली बिश्त यांनी पुन्हा एकदा करवाल नगरमध्ये विजय मिळविला. आम आदमी पक्षाच्या दुर्गेश पाठक यांचा त्यांनी पराभव केला होता.

२०२५ च्या निवडणुकीपूर्वी मोहन सिंह बिश्त यांचे करवाल नगरमधून तिकीट कापण्यात आले होते. तेव्हा बिश्त यांनी भाजपाची ही सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते. भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतही मुस्तफाबादमध्ये मिश्रा यांच्या नावाला पसंती देण्यात आली होती. बिश्त यांच्या नाराजीनंतर भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांची समजूत काढत, या मतदारसंघात पहाडी मतदारांची जास्त लोकसंख्या असल्याचे सांगितले.

मोहन सिंह बिश्त द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, मी १९९८ ते २००८ या काळात करवाल नगरमधून आमदार म्हणून निवडून आलो. यावेळी मुस्तफाबाद मतदारसंघाची स्थापना झाली. मी प्रचारासाठी फिरत असताना लोक माझ्या समर्थनार्थ रस्त्या-रस्त्यावर उतरत होते. मुस्तफाबादमध्ये भाजपाचा विजयी होणारा मी पहिला उमेदवार असेल.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, बिश्त हे जनतेसाठी कायम उपलब्ध असलेले नेते आहेत. स्थानिक प्रश्नांना सोडविण्याची त्यांची हातोटी, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकासाची त्यांची दृष्टी निश्चितच त्यांना लाभदायक ठरेल.

Story img Loader