Hasan Mushrif मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. यामध्ये ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातली लक्षणीय व्यक्ती ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ. याचं कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत. आपण जाणून घेऊ कोण आहेत हसन मुश्रीफ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हे आत्तापर्यंत सहावेळा निवडून आले आहेत. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. १३ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यापैकी उत्तर प्रदेशात दानिश अहमद हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत. ज्यांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे. तर भाजपाच्या मित्रपक्षांची सत्ता जिथे आहे म्हणजेच टीडीपी आणि जनता दल अर्थात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार. या दोघांच्या राज्यांमध्येही प्रत्येकी एक एक मुस्लिम व्यक्तीकडे मंत्रिपद आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांचं नाव येतं. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले ते एकमेव मुस्लिम आमदार आहेत.

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी
Pakistan former PM Imran Khan
Imran Khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कायदेभंग आंदोलन करण्याचे आवाहन, पाकिस्तानमध्ये यादवी माजणार?
deputy chief minister position does not exist in constitution but post not unconstitutional
 ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून शपथ घेता येते का?
Eknath Shinde Ramdas Athawale
Eknath Shinde : “शिंदे उपमुख्यमंत्री होणार”, महायुतीच्या बैठकीतील माहिती देत आठवले म्हणाले, “फडणवीसांनीच सांगितलंय…”
chhagan Bhujbal on cabinate marathi news
मंत्रिमंडळातील नावांवर होणारी चर्चा म्हणजे केवळ अंदाज, छगन भुजबळ यांचा दावा
Gulabrao Patil on Eknath Shinde
Gulabrao Patil : ‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळायला हवं होतं’, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

१९६० पासूनचा इतिहास काय सांगतो?

१९६० पासून म्हणजेच महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ७० मुस्लिम आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकी ३६ जणांनी कॅबिनेट मंत्रिपद भुषवलं आहे तर ३४ जणांनी राज्यमंत्रिपद भुषवलं आहे. पारंपरिक रित्या मुस्लिम समुदायाला मंत्रिमंडळात दोन किंवा तीन जागा मिळतात. १९९९ ते २००४ या कालावधीत काँग्रेसच्या काळातही ही संख्या अशीच होती.

हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हे सहावेळा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. त्यांचे लहान भाऊ इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून निवृत्त झाले आहेत. हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांच्या भावाचं नाव शमशुद्दीन मुश्रीफ असं आहे. त्यांनी Who Killed Karkare? हे पुस्तक लिहिलं आहे. 26/11 चा जो हल्ला मुंबईवर झाला त्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

आपण जाणून घेऊ कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात किती मुस्लिम मंत्री होते?

यशवंतराव चव्हाण (कार्यकाळ १९६० ते १९६२)

एस. जी. काझी हे कॅबिनेट मंत्री, होमी टायलर खान (पारशी मंत्री)

मारोतराव कन्नमवार (१९६२ ते १९६३)

सालेहभोय अब्दुलकादर (मुस्लिम मंत्री), होमी टायलर खान (पारशी मंत्री), एक उपमंत्री रफिक झकारिया.

वसंतराव नाईक (१९६३ ते १९६७)

कॅबिनेट मंत्री रफिक झकारिया, होमी टायलर खान (पारशी मंत्री)

वसंतराव नाईक (१९६७ ते १९७२)

रफिक झकारिया (मुस्लिम मंत्री)

ए. आर. अंतुले (राज्यमंत्री)

वसंतराव नाईक (१९७२ ते १९७५)

रफिक झकारिया (मुस्लिम मंत्री)
ए. आर. अंतुले (मुस्लिम मंत्री)

शंकराव चव्हाण (१९७५ ते १९७७)

रफिक झकारिया (मुस्लिम मंत्री)
ए. आर. अंतुले ( मुस्लिम मंत्री)
जे लेओन डिसूझा, राज्यमंत्री

वसंतराव पाटील (एप्रिल १९७७ ते मार्च १९७८)

हुसैन दलवाई (मुस्लिम मंत्री)

सय्यद फारुख सय्यद पाशा, राज्यमंत्री

शरद पवार (१९७८ ते १९८०)

निहाल अहमद , इसाक जामखानवाला (राज्यमंत्री)

ए. आर. अंतुले (१९८० ते १९८२)

मुस्लिम मुख्यमंत्री-ए. आर. अंतुले

खान मोहम्मद अझहर हुसैन (राज्यमंत्री)

बाबासाहेब भोसले (१९८२ ते १९८३)

असीर शेख, खान मोहम्मद अझहर हुसैन (राज्यमंत्री), अब्दुल अझीम (मुस्लिम मंत्री) एक उपमंत्री मोमिन वकार अहमद

वसंतराव पाटील (१९८३ ते १९८५)

असीर शेख, खान मोहम्मद अझहर हुसैन (राज्यमंत्री), जावेद खान (राज्यमंत्री), अब्दुल अझीम (राज्यमंत्री)

शिवाजी पाटील निलंगेकर (१९८५ ते १९८६)

जावेद खान

शंकरराव चव्हाण (१९८६ ते १९८८)

सय्यद अहमद

शरद पवार (१९८८ ते १९९०)

इसाक जामखानावाला, जावेद खान (राज्यमंत्री), सय्यद अहमद (राज्यमंत्री)

सुधाकरराव नाईक (१९९१ ते १९९३)

जावेद खान, काझी अब्दुल खलिक (राज्यमंत्री)

शरद पवार (१९९३ ते १९९५)

सलीम झकारिया आणि जावेद खान

मनोहर जोशी (१९९५ ते १९९९)
साबिर शेख (मुस्लिम मंत्री)

नारायण राणे ( फेब्रुवारी ते ऑक्टोबर १९९९ )
साबिर शेख

विलासराव देशमुख (१९९९ ते २००३)

सय्यद अहमद, दलवाई (मुस्लिम मंत्री)
अनीस अहमद, नवाब मलिक, आरिफ नसीम खान, नुराउद्दीन हिरानी, हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) (पाच मुस्लिम राज्यमंत्री)

सुशील कुमार शिंदे (२००३ ते २००४)

सय्यद अहमद (मुस्लिम मंत्री), हाजी अनीस अहमद, आरिफ नसीम, नवाब मलिक, हसन मुश्रीफ (एकूण चार राज्यमंत्री)

विलासराव देशमुख (२००४ ते २००८)

अनीस अहमद, नवाब मलिक, आरिफ नसीम खान (तिघेही कॅबिनेट मंत्री), बाबा सिद्दीकी (राज्यमंत्री)

अशोक चव्हाण (२००८ ते २००९)

अनिस अहमद, नवाब मलिक (मुस्लिम मंत्री)
हसन मुश्रीफ (राज्यमंत्री)

अशोक चव्हाण २००९ ते २०१०

नसीम खान, हसीन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) (मुस्लिम मंत्री, कॅबिनेट), अब्दुल सत्तार, फौजिया खान (दोन राज्यमंत्री)

पृथ्वीराज चव्हाण २०१० ते २०१४

आरिफ नसीम खान, हसन मुश्रीफ (दोघंही कॅबिनेट मंत्री), फौजिया खान (राज्यमंत्री)

उद्धव ठाकरे २०१९ ते २०२२

नवाब मलिक, अस्लम शेख, हसन मुश्रीफ (तिघेही कॅबिनेट मंत्री)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)

एकनाथ शिंदे (२०२२ ते २०२४)

अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) (दोघे कॅबिनेट)

२०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत राज्यात कुठल्याही मुस्लिम आमदाराकडे मंत्रिपद नव्हतं. आता या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यात हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.

Story img Loader