लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर आता भाजपा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावेही घोषित करीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. काँग्रेसने गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना तिकीट दिले आहे. १९९९ ते २००४ दरम्यान सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर होते. त्यावेळी सत्तेच्या सारीपाटावर केवळ दोन जावयांचीच नावे चर्चेत होती. एक कृष्णाचा जावई व्ही. जी. सिद्धार्थ आणि दुसरा मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी. कृष्णाचा जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांचे २०१९ मध्ये निधन झाले.

खरगे हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यावेळी ते राज्याचे शक्तिशाली नेते होते आणि गृहमंत्री होते. एस एम कृष्णा यांचे जावई सिद्धार्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकत होते. मात्र, खरगे यांच्या जावयाची तशी वृत्ती नव्हती. यावेळी काँग्रेसने कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच राज्यमंत्र्यांच्या मुला-मुलींना आणि काही नेत्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी आहेत.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा

गुलबर्ग्याची जागा काँग्रेसने तीन वेळा गमावली

दोड्डामणी यांना गुलबर्गा लोकसभा जागा पुन्हा ताब्यात घेण्याचे काम देण्यात आले आहे. कधी काळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. १९५२ ते २०१९ पर्यंत काँग्रेस पक्षाने केवळ तीनदाच ही जागा गमावली आहे. खरगे यांचा त्यांच्या ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच निवडणूक पराभव होता. दोड्डामणी हे आतापर्यंत खरगे यांचे राजकीय आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होते. कलबुर्गी येथील एका स्थानिक नेत्याने सांगितले की, दोड्डामणी हे एक चांगला मित्र म्हणून ओळखले जातात. ते नेहमी लोकांना मदत करतात आणि दयाळूपणा दाखवतात. ते लोकांशीही उत्तम संवाद साधतात. गुरुमितकलमधील निवडणुका आणि कारभार सांभाळण्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे. २०१९ मध्ये खरगे यांच्या पराभवाचे एक कारण म्हणजे या भागातील मतदार दलित समाजापासून हळूहळू दुरावत जाणे हे होते. खरगे हे दलित समाजातून आलेले असून, दोड्डामणी हे खरगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीतील दोड्डामणी यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे खरगे कुटुंबीय आणि परिसरातील मागासलेल्या लोकांमधील दरी कमी करणे हे आहे. एका स्थानिक काँग्रेस नेत्याने सांगितले की, काँग्रेस दलित आणि मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करण्यावर काम करू शकते. त्याचबरोबर स्थानिक राजकारणालाही बरोबर घ्यावे लागेल. दोड्डामणी यांचा सामना विद्यमान खासदार उमेश जाधव यांच्याशी होणार आहे. ते काँग्रेस पक्षाचे माजी आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात बंड केले आणि भाजपामध्ये प्रवेश केला. खरगे यांना पराभूत करण्यासाठी जाधव यांनी प्रदेशात पंतप्रधान मोदींच्या नावाने पाठिंबा मिळवला आणि इतर काही समीकरणे बळकट केली.

हेही वाचाः काँग्रेसमधून भाजपात येताच मिळालं लोकसभेचं तिकीट; कोण आहेत नवीन जिंदाल?

मल्लिकार्जुन खरगेंचा निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहण्याचा निर्णय

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष म्हणून आपल्या अनेक कार्यक्रमांचा हवाला दिला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही त्यांना खूप विनंती केली होती. आता या जागेवरून आणखी एक पराभव काँग्रेस पक्षासाठी मोठा अडथळा ठरू शकतो, अशी भीती त्यांना वाटत आहे. विशेषत: खरगे यांच्याकडे राज्यसभा सदस्य म्हणून आणखी दोन वर्षे आहेत. खरगे यांनी या प्रदेशाचा लक्षणीय विकास केल्याची माहिती आहे. गुलबर्गा येथे हृदय आणि कर्करोग उपचारांसाठी सरकारी रुग्णालये तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्याचे श्रेय जाते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई दोड्डामणी हे बंगळुरूच्या प्रसिद्ध डॉ. भीमराव आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयाचे विश्वस्त आहेत. ते एक प्रसिद्ध उद्योगपतीही आहेत. खरगे यांचा मुलगा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याबरोबरही ते काही व्यवसायात भागीदार आहेत.

हेही वाचाः पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून डाव्या पक्षांत मतभेद; सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे?

कोण आहेत जयप्रकाश हेगडे?

काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या दिग्गजांमध्ये ७१ वर्षीय के जयप्रकाश हेगडे यांचाही समावेश आहे. ते माजी खासदार आणि राज्यमंत्री आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष असलेले हेगडे यांचा कार्यकाळ २९ फेब्रुवारीला संपुष्टात आला. तसेच १२ मार्च रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उडुपी जिल्ह्यात या नेत्याचा दबदबा असून, ते तीन वेळा अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी जनता दल, काँग्रेस आणि भाजपाशीही त्यांचा संबंध होता. १९९४ ते १९९९ दरम्यान ते जनता दल सरकारमध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री होते आणि सीमांकनानंतर उडुपीमधील त्यांचा पूर्वीचा ब्रह्मावर मतदारसंघ संपुष्टात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१२ च्या पोटनिवडणुकीत ते उडुपी-चिकमगलूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

काँग्रेसचे दिग्गज नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वर्चस्व असलेल्या उडुपीमधील राजकीय वर्चस्वासाठी संघर्षामुळे त्यावेळी हेगडे यांना पक्षातून बाहेर पडावे लागले होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजापमध्ये प्रवेश केला आणि मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या जातिगणनेचा अहवाल अध्यक्ष म्हणून त्यांच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस सरकारला सादर केले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या सर्वेक्षणाचा अहवाल राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असण्याची अपेक्षा आहे, काँग्रेसमध्येही याच्या बाजूने आणि विरोधात जोरदार मते आहेत. हेगडे हे व्यवसायाने वकील आणि न्यायाधीशांचे पुत्र आहेत. शिमोगा कर्नाटक प्रीमियर लीग क्रिकेट संघाच्या मालकांपैकी ते एक होते, जो संघ २०१६ मध्ये ३.२५ कोटींना विकत घेण्यात आला होता.

Story img Loader