आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांची पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे याआधी राज्याच्या आयटी विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार होता. राजीव कुमार हे ममता बॅनर्जींचे विश्वासू अधिकारी समजले जातात. २०१९ साली सीबीआयने कुमार यांच्या घरावर छापेमारी केली होती. शारदा चिटफंडातील गैरव्यवहाराची चौकशी करताना ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले होते.

२०१९ साली कुमार यांच्या घरावर छापेमारी

शारदा चिटफंडातील गैरव्यवहाराप्रकरणी राजीव कुमार यांच्या घरावर सीबीआयने २०१९ सालातील फेब्रुवारी महिन्यात छापेमारी केली होती. तेव्हा बॅनर्जी यांनी या छापेमारीचा विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली होती. याच छापेमारीविरोधात त्यांनी ७० तासांसाठी आंदोलन केले होते. राजीव कुमार यांच्या विरोधात अटकेची कोणतीही कारवाई करू नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बॅनर्जी यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

Raju Parve resigned from Umred constituency and joined Bharatiya Janata Party
माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी

राजीव आयआयटी रुरकीचे माजी विद्यार्थी

राजीव कुमार हे मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते आयआयटी रुरकीचे माजी विद्यार्थी आहेत. आयपीएस झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांची चंदननगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते बीरभूम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक झाले. २००८ साली ते कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे सहआयुक्त होते.

शारदा चिटफंडातील गैरव्यवहाराचे तपासप्रमुख

सध्या जरी ते ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जातात, तरी ममता बॅनर्जी २०११ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर राजीव कुमार आणि बॅनर्जी यांच्यात बरेच मतभेद होते. काही उच्च पोलिस अधिकाऱ्यांनी कुमार यांच्या क्षमतांबाबत सांगितल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कुमार यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर जानेवारी २०१२ मध्ये कुमार यांची बिधाननगरचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१३ साली शारदा चिटफंडातील गैरव्यवहार समोर आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाचे कुमार यांनी नेतृत्व केले.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बदली

राजीव कुमार यांची २०१६ साली कोलकाता पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. याच काळात राजीव कुमार यांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कुमार यांची बदली करण्याचा आदेश दिला. मात्र, निवडणूक झाल्यानंतर कुमार यांची पुन्हा आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.