Maharashtra Political News: : १९९५ ते २०१९ या दरम्यान सावनेर मतदारसंघात झालेल्या सहापैकी पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करून आपला दबदबा निर्माण करणारे काँग्रेस नेते सुनील केदार २०२४ च्या विधानसभा निवडणूक रिंगणात नसणार आहेत. तीन दशकांनंतर प्रथमच केदारांशिवाय होणाऱ्या निवडणुकीसाठी बालेकिल्ल्यातच काँग्रेसला नवा चेहरा द्यावा लागणार असून तो चेहरा केदार कुटुंबातील असेल की, अन्य याबाबत उत्सुकता आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघ हा सुनील केदार यांचा बालेकिल्ला मानला जातो. १९९५मध्ये प्रथम ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीकडून लढले व पराभूत झाले. त्यानंतर मात्र त्यांची विजयी घोडदौड कायम आहे. २००४ ते २०१९ या दरम्यान झालेल्या चारही विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी विशषत: भाजपने त्यांच्यापुढे उभे केलेले प्रत्येक आव्हान त्यांनी मोडून काढत सावनेरची जागा कायम राखली. सावनेर म्हणजे सुनील केदार असे समीकरणच तयार व्हावे इतकी भक्कम पकड त्यांची या मतदारसंघावर आहे.

Chief Minister Eknath Shindes private secretary Balaji Khatgaonkar preparing to contest the Assembly
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विधानसभा लढण्याच्या तयारीत!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
issue of Nagpur-Goa Shaktipeeth highway is getting heated politically before assembly elections
शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा तापणार
BJP opposes Rashtriya Samaj Party MLA
‘रासप’च्या आमदाराला भाजपचा विरोध
amit Deshmukh nilanga vidhan sabha marathi news
कारण राजकारण: संभाजी निलंगेकरांना घेरण्याची देशमुख यांची व्यूहरचना, विजय खडतरच…
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
bjp searching candidate against nitin raut in north nagpur assembly constituency
कारण राजकारण : नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप उमेदवाराच्या शोधात

आणखी वाचा- कारण राजकारण : कागलची बदलती समीकरणे कुणाच्या पथ्यावर?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ही बाब अधोरेखित झाली. संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असणारे ते एकमेव नेते असून भाजपशी थेट संघर्ष करीतच त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. नागपूर जिल्हा परिषद त्यांनी भाजपकडून खेचून आणली. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी रामटेकची जागा काँग्रेसला जिंकून दिली. त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळवायचे असेल तर केदार यांना राजकीयदृष्या संपवणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन भाजपने आतापर्यंत पावले उचलली, त्यांच्या विरुद्ध चौकशीचा ससेमिरा लावला, काँग्रेसमधील पक्षांतर्गत केदार विरोधकांना फूस देत त्यांना सावनेरमधून उमेदवारी दिली. मात्र तरीही केदार पुरून उरल्याचे दिसून आले.

रोखे घोटाळ्यामुळे निवडणुकीबाहेर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळा प्रकरणात न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले तसेच सहा वर्षांसाठी त्यांना निवडूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे तीस वर्षांत प्रथमच सावनेरची विधानसभा निवडणूक केदार यांच्याशिवाय होणार आहे. केदार निवडणूक रिंगणात नसले तरी मतदारसंघातील राजकारणाची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती राहणार हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत सावनेरसह सर्व सहाही मतदारसंघांत काँग्रेसला आघाडी आहे. त्यामुळे केदार ठरवतील तोच काँग्रेसचा उमेदवार असेल हे निश्चित आहे. इच्छुकांमध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचे आहे. त्यांनी मधल्या काळात मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला होता. अनुजा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांच्या त्या कन्या आहेत.

आणखी वाचा-कारण राजकारण : अजितदादांच्या संजयची उदगीरमध्ये कोंडी?

पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता

भाजपकडून केदार यांचे पारंपरिक राजकीय विरोधक व माजी आमदार आशीष देशमुख यांना यावेळी रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी कामही सुरू केले आहे. केदार यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून देशमुख ओळखले जातात. यापूर्वी १९९५ आणि २००९ मध्ये सावनेरमध्ये केदार विरुद्ध देशमुख लढत झाली होती. त्यात केदार विजयी झाले होते.२०२४ मध्ये तिसऱ्यांदा देशमुख सावनेरच्या रिंगणात उतरणार आहेत. राजकारणातील धरसोड वृत्ती आणि स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांकडून देशमुख यांना किती प्रमाणात सहकार्य मिळते यावरच त्यांच्या लढतीचे चित्र ठरणार आहे.