भाजपाने छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची संधी केंद्रात मंत्री राहिलेले विष्णुदेव साय यांना दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार काढून घेण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक संपल्यानंतर त्यांना थेट राज्याचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

अमित शाह यांनी दिले होते संकेत

गेल्या महिन्यात निवडणुकीच्या प्रचारादम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विष्णुदेव साय यांनाच मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे संकेत दिले होते. तुम्ही साय यांना आमदार बनवा मी त्यांना मोठा माणूस बनवतो, असे अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर आता साय यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची संधी चालून आली आहे. साय हे एकूण चार वेळा खासदार राहिलेले आहेत. तसेच एकूण तीन वेळा भाजपाने त्यांची छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली होती. २००६, २०११ आणि २०२० अशा एकूण तीन वेळा साय हे छत्तीसगडचे भाजपा प्रदेशाध्यक्ष होते. २०२० सालचा त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ फार मोठा नव्हता. गेल्याच वर्षी त्यांना बाजूला सारून त्यांच्या जागेवर अरूण साओ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
dr shraddha tapre
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

सुरगुजा प्रदेशातील सर्व जागांवर विजय

साय हे छत्तीसगड राज्यातील सुरगुजा या आदिवासी प्रदेशातून येतात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या प्रदेशातील पूर्ण १४ जागा जिंकलेल्या आहेत. साय हे आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते आहेत.

साय यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर भाजपाच्या इतर नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. साय यांच्या नेमणुकीतून भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करते, हा संदेश गेला आहे. साय हे सर्वमान्य नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी पक्षाचे प्रभावी पद्धतीने नेतृत्व केलेले आहे, अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली आहे.

आदिवासी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करून भाजपाने आदिवासी समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही निवडणूक पाहता, भाजपाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

साय यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी

विष्णुदेव साय यांचा जसपूर जिल्ह्यात जन्म झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. १९४० ते १९७० या काळात त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. भाजपाचे नेते दिलीप सिंह जुदेव यांनी छत्तीसगडमध्ये ‘घरवापसी मोहीम’ राबवली होती. दिलीप सिंह यांनीदेखील साय यांना पाठिंबा दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरुवात

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरून साय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे. ग्रामपंचायतचे सदस्य ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. मध्य प्रदेशचे विभाजन होण्याआधी त्यांनी १९९० ते १९९८ या काळात तपकारा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले. रायगड या मतदारसंघातून ते सलग चार वेळा (१९९९ ते २०१९) निवडून आलेले आहेत. २०१४ साली मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. मात्र, २०१९ साली त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत ते २००३ आणि २००८ साली एकूण दोन वेळा पराभूत झाले.

भाजपाचा ९० पैकी एकूण ५४ जागांवर विजय

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुनकुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवत एकूण २५ हजार ५४१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपाने या निवडणुकीत ९० पैकी एकूण ५४ जागांवर विजय मिळवला आहे. आदिवासी पट्ट्यात चांगली कामगिरी केल्यामुळे भाजपाला हा आकडा गाठता आला आहे.

भाजपाने यावेळी सुरगुजा या मतदारसंघातील सर्व जागा जिंकलेल्या आहेत. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने या प्रदेशातून चांगली कामगिरी केली होती.