पुणे: बारामती लोकसभा मतदार संघातून पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर मागील दाराने राज्यसभेची खासदारकी मिळविणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर ७० कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी सभांपासून ते विविध प्रकारच्या प्रचारासाठी ४९ लाख ८९ हजार ५६१ रुपयांचा खर्च केला. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या खात्यातून एक पैसाही खर्च झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखविलेलीच संपत्तीच राज्यसभेची उमेदवारी दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये दाखविली आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च नक्की कोणाच्या खिशातून केला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यामध्ये मालमत्ता आणि दाखल असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती द्यावी लागते. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी स्वत:च्या नावावर असलेल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. लोकसभेसाठी त्यांनी १२ मार्च २०२४ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रात त्यांची जंगम मालमत्ता १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपये, स्थावर मालमत्ता ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपये दाखविली आहे. त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता ही सुमारे ७० कोटी ९५ लाख ९९ हजार ७३४ रुपये आहे. याशिवाय वारसाहक्काने त्यांना ३३ कोटी नऊ लाखाची संपत्ती मिळाली आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

आणखी वाचा-विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेआधी महायुती-मविआची परिक्षा; अजित पवारांच्या अडचणीत मात्र वाढ

बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविताना त्यांनी प्रचारासाठी किती रुपये खर्च केले, याचा तपशील दिला आहे. त्यामध्ये ४९ लाख ८९ हजार ५६१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तो खर्च निवडणूक प्रतिनिधी म्हणून किरण गुजर यांच्या नावावर दाखविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांचा खर्च केलेला नाही. त्यामुळे एक पैसाही खर्च न करता सुनेत्रा पवार यांची लोकसभेची निवडणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीची माहिती दिली आहे. हे प्रतिज्ञापत्र त्यांनी ११ मे २०२४ रोजी सादर केले आहे. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरेपर्यंतच्या सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नसल्याचे प्रतिज्ञापत्रावरून उघड झाले आहे.

आणखी वाचा-पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?

निवडणूक प्रचार खर्चात तफावत

सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला खर्च निवडणूक आयोगाच्या दैनंदिन खर्च नोंदवहीत नोंदवण्यात आला आहे. पवार यांच्या प्रतिनिधीने चार मे २०२४ रोजी दिल्या हिशोबानुसार ४९ लाख ८९ हजार ५६१ खर्च दाखविला आहे. मात्र, आयोगाच्या छायांकित खर्च नोंद वहीतील नोंदीनुसार एक कोटी १ लाख २९ हजार ८४५ रुपये दाखविला आहे. आयोगाने ६१ लाख ६१ हजार ६१९ रुपयाची तफावत असल्याचे दाखवून सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंतची खर्च करण्याची मर्यादा घालण्यात आलेली आहे.