Bihar Loksabha Election आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. दोन्ही गटांतील घटक पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतदेखील बंहुतांश विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारचे संपूर्ण राजकारण MY आणि BAAP वर अवलंबून आहे. MY चा अर्थ – M म्हणजे मुस्लीम व Y म्हणजे यादव असा आहे, तर BAAP चा अर्थ – B म्हणजे बहुजन (मागास), A म्हणजे आगडा (पुढारलेला समाज), A म्हणजे आधी आबादी (महिला) आणि P म्हणजे पुअर (गरीब) असा आहे. बिहारच्या निवडणुकीत याच वर्गांना लक्ष्य केले जात आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (राजद) मुस्लीम-यादव म्हणजेच MY चा पक्ष म्हणून ओळखला जायचा. परंतु, यंदा इंडिया आघाडीबरोबर आल्याने BAAP लादेखील लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात पाटणा येथे पार पडलेल्या ‘जन विश्वास रॅली’मध्ये राजद नेते तेजस्वी यादव यांनी असा उल्लेखही केला होता. “काही लोक म्हणतात, आमचा पक्ष हा MY-मुस्लीम व यादवांचा पक्ष आहे. परंतु मला सांगायचे आहे की, आमचा पक्ष MY-BAAP आहे”, असे ते म्हणाले होते.

Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
BRSP, assembly election Maharashtra,
बीआरएसपी विधानसभेच्या मैदानात, दीडशे जागांवर चाचपणी
Republican Party of India demand of 12 seats for Assembly election
विधानसभेसाठी रिपाइंला हव्यात १२ जागा; जागा न दिल्यास प्रचार नाही, रिपाइंची भूमिका
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
All parties rally for womens vote in Raigad
रायगडमध्ये महिला मतांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी
Vijay wadettiwar
“निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच मविआची उमेदवारी”, विजय वडेट्टीवारांचे विधान
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!

राजदने देऊ केलेल्या जागांवरच काँग्रेसने मानले समाधान

त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या निवडणुकीत राजदने ओबीसी (लव-कुश किंवा कुर्मी-कोरी) उमेदवारांसह आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) उमेदवारदेखील उभे केले आहेत. मात्र, काँग्रेस आपल्या नऊ जागांच्या यादीवर फारशी खूश नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपाबरोबर गेल्याने बिहारमधील इंडिया आघाडीत जागावाटपाचा तिढा काही सुटत नव्हता. जागावाटप निश्चित झाल्यावर राजदने देऊ केलेल्या जागांवरच काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत, त्यापैकी २६ जागा राजद, नऊ जागा काँग्रेस आणि उर्वरित पाच जागा डाव्यांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

२०१९ मध्ये लढवलेल्या १९ जागांपैकी एकही जागा राजदला जिंकता आली नव्हती. परंतु, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढलेल्या महागठबंधनने ११० जागा जिंकल्या होत्या. ७५ जागा जिंकत राजद सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला होता. त्या काळात लालूंची अनुपस्थिती असतानाही राजद सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला, त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजदने २६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राजदचा काँग्रेसवर विश्वास नाही?

“२०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लढवलेल्या ७० जागांपैकी केवळ १९ जागा जिंकल्यापासून त्यांचा (लालू) काँग्रेसवरील विश्वास उडाला. सीपीआय(एमएल) ला तीन लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या. सीपीआय(एमएल)ने २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही १२ जागा जिंकल्या होत्या. लालू आणि तेजस्वी यांनी पुन्हा संयोजन तयार केले असून २०२४ च्या निवडणुकीत ‘नोकरी’ हा त्यांचा मुख्य मुद्दा असणार आहे”, असे राजदमधील एका नेत्याने सांगितले.

‘या’ मतदारसंघांवर राजदचे विशेष लक्ष

राजदने जागांचा अभ्यास करूनच उमेदवार जाहीर केले आहेत. सारण लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. या जागेवरून लालू यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालू यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना त्यांचाच मतदारसंघ असलेल्या पाटलीपुत्रमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे राम कृपाल यादव यांच्याविरुद्ध तिसऱ्यांदा त्या विजयी होतील, अशी आशा राजदला आहे. सारणचे भाजपा उमेदवार राजीव प्रताप रुडी त्याच जागेवर तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. लालू प्रसाद यादव यांनी या जागेवर अनेक वेळा प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे राजदला सारण ही जागा खेचून आणायची आहे. सीतामढी, शिवहर, सिवान, औरंगाबाद, वैशाली, सुपौल, मधेपुरा, अररिया, पूर्णिया आणि नवादा या जगांकडेही राजदचे विशेष लक्ष आहे.

राजदमधील बंडखोर नेत्या हिना शहाब (दिवंगत राजद खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी) यांनी सिवानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना एआयएमआयएमचा पाठिंबा आहे. हिना यांचे पती शहाबुद्दीन यांनी चार वेळा या जागेवर प्रतिनिधीत्व केले आहे, परंतु पत्नी हिना शहाबला राजदच्या तिकिटावर तीनदा निवडणूक लढवून पराभवाचा सामना करावा लागला आहे. एआयएमआयएमने पाठिंबा दिला असला तरी राजदला यावर आक्षेप नाही. कारण, त्यांना मुस्लीम मतांची विभागणी होऊ द्यायची नाही. सध्या या जागेवर जेडी(यू ) प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी निवडणुकीसाठी जेडी (यू) ने सिवान जागेवरून विजयालक्ष्मी कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे.

काराकाट येथे राष्ट्रीय लोक मोर्चा प्रमुख उपेंद्र कुशवाह आणि आरा येथे केंद्रीय मंत्री व भाजपा नेते आर. के. सिंह यांना सीपीआय (एमएल) नेते टक्कर देतील, अशी इंडिया आघडीला अपेक्षा आहे. खगडिया येथे सीपीआय(एम)ची लढत एलजेपीशी आहे. बेगुसरायमध्ये इंडिया आघाडीने काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांना मैदानात न उतरवून, लो-प्रोफाइल अवधेश राय यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर सध्या भाजपाचे खासदार गिरीराज सिंह प्रतिनिधित्व करत आहेत. मुस्लीम लोकसंख्येमुळे काँग्रेससाठी केवळ किशनगंज ही जागा सुरक्षित असल्याचा अंदाज आहे.

सात टप्प्यातील मतदानाचा एनडीएला फायदा

एनडीएने मागील निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये फारसा बदल केला नाही. भाजपाने बक्सरमधून दिग्गज अश्विनी कुमार चौबे यांना वगळले, तर शिवहरमधूनही रमा देवी यांना वगळून जेडी(यू) च्या लवली आनंद यांना उमेदवारी दिली. मुझफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनाही वगळण्यात आले. यंदाही एनडीएचा पारडा भारी आहे. बिहार निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात जास्तीत जास्त सभा घेण्याची संधी आहे.

जेडी(यू) देखील याच संधीचे सोने करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा जेडी(यू) ला होणार हे निश्चित आहे. कारण नितीश कुमार यांच्याशिवाय पक्षाकडे फारसे स्टार प्रचारक नाहीत. निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री राज्यभरात छोटेखानी भाषण करणार आहेत. “यावेळी पुलवामासारखा कोणताही भावनिक मुद्दा नाही, त्यामुळे एनडीएसाठी पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता महत्त्वपूर्ण ठरेल,” असे एका जेडी(यू) नेत्याने सांगितले.

हेही वाचा: काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

राज्यातील सर्व ४० जागा जिंकण्याचा दावा एनडीएने केला आहे. नितीश कुमार, चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहसारखे लोकप्रिय चेहरे गैर-यादव ओबीसींसह दलित मतदारांनादेखील एनडीएकडे आकर्षित करतील अशी अपेक्षा आहे. “२०१९ मध्ये ज्या जागा जिंकल्या, त्याच जागा यंदाच्या निवडणुकीत जिंकू, हे निश्चित नाही. एनडीएला हे चांगल्याप्रकारे माहिती आहे. ही एक नवीन लढाई आहे. आम्ही राजदला हलक्यात घेऊ शकत नाही. कारण आम्हाला अजूनही २००४ च्या निवडणुका आठवतात, जेव्हा एनडीएच्या ‘इंडिया शायनिंग’ घोषणेचा उलटसुलट परिणाम झाला होता आणि राजदने बिहारमध्ये २२ जागा जिंकल्या होत्या”, असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.