मोहन अटाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : ‘शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मी खासदार झाले, अन्यथा होऊ शकले नसते’, अशी जाहीर कबुली चार महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात खुद्द पवारांसमोर देणा-या खासदार नवनीत राणा यांनी रविवारी दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना खासदारकीचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने राणा दाम्पत्याचे ‘सोयीचे राजकारण’ पुन्हा चर्चेत आले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसल्याने माझा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस २०१४ च्या निवडणुकीत सोबत असते तर मी त्यावेळी निवडून आले असते. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसले तरी त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असल्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक त्यांनी केले.
हेही वाचा… हिंगोली : कळमनुरीतील डॉ. संतोष टारफे, अजित मगर यांची पक्षीय सीमोल्लंघनाची तयारी
नवनीत राणा यांच्या परस्परविरोधी दाव्यांची चर्चा आता रंगली आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी शरद पवार यांना आपल्या राजकीय वाटचालीचे श्रेय दिले होते. पवार जे बोलतात, तेच महाराष्ट्रात होते. त्यांनी जे ठरवले, तसेच महाराष्ट्रात घडते, असेही नवनीत राणा यांनी त्यावेळी म्हटले होते.
नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली, पण त्या पराभूत झाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात लढत दिली. त्यावेळी नवनीत राणा यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. नवनीत राणा या विजयी झाल्या, पण त्यांनी लगेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडली. नवनीत राणा या निवडणुकीनंतर आपली साथ देणार नाहीत, असा संशय निवडणूक प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला होता. एका प्रचार सभेत तर त्यांच्याकडून वचनही घेण्यात आले होते. पण, निवडणूक निकालानंतर लगेच नवनीत राणा यांनी वेगळा रस्ता निवडल्याचे शल्य अजूनही कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी अडसूळांचा पराभव करून विजय मिळवला होता. आता त्यांनी भाजपचा आणि फडणवीसांचा पाठिंबा असल्यामुळे मी खासदार झाले असे वक्तव्य केल्यामुळे फडणवीसांनी तात्कालीन युती असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नवनीत राणांना मदत केली का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…
नवनीत राणा यांनी केंद्रात भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे, तर महाराष्ट्रात आमदार रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सातत्याने आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा राहील आणि दोन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता येईल, असा दावा रवी राणा यांनी केल्यानंतर लगेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेराचा आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेला असेल, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे राणा दाम्पत्य हे आगामी निवडणुका भाजपकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.