राज्यात शिंदे-फडणवीस यांनी जून महिन्यात सत्तांतर केल्यानंतर नागपूरमध्ये या सरकारचे दुसरे अधिवेशन संपन्न होत आहे. जुलै महिन्यात झालेल्या पहिल्याच अधिवेशनात महाविकास आघाडीने ‘५० खोके…’ घोषणा देऊन सरकारला जेरीस आणले होते. त्यामुळे विरोधकांच्या सोबतच सत्ताधाऱ्यांनाही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर येऊन महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करावं लागलं होतं. हाच कित्ता विरोधकांनी हिवाळी अधिवेशनातही गिरवला. यात विशेषतः आघाडीवर होते ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे. सभागृहात संसदीय आयुधाचा वापर करुन सरकारला धारेवर धरणं आणि विधीमंडळाच्या बाहेर पायऱ्यांवर घोषणाबाजी देण्याची भूमिका या अधिवेशनात आदित्य ठाकरे घेताना दिसले. त्यानंतर अचानक लोकसभेत खासदार राहुल शेवाळे हे दोन वर्षांपूर्वीचे सुशांत सिंह राजपूतचे प्रकरण बाहेर काढतात आणि त्याचे पडसाद विधीमंडळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पडतात.

“आमदारांना पळून जाण्यासाठी रस्त्यांची गुणवत्ता तपासा”

हिवाळी अधिवेशनाची १९ डिसेंबर रोजी सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यांच्या प्रश्नांसंबंधी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारला एक टोला लगावला होता. “मुंबई-सुरत रस्त्यावर चाळीस आमदार रात्रीदेखील पळून गेले होते. त्या रस्त्याची गुणवत्ता तपासून तसे रस्ते महाराष्ट्रातही होतील, याची काळजी घ्या”, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला चिमटा काढला. “सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतल्याचे दिसतंय. शिल्लक सेनेत जे थोडेसे आमदार उरलेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागू नये, याकडे लक्ष द्या”, असं प्रत्युत्तर सरकारतर्फे उत्तर देत असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं.

Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
report on climate change reveals power of mosquito increases four times more
हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
Loksatta chawadi Gokul Dudh Sangha Annual Meeting Kolhapur District Central Cooperative Bank Guardian Minister Hasan Mushrif print politics news
चावडी: सत्तेत आहात मग प्रश्न सोडवा की…
Badlapur school, child abuse case, badlapur child abuse case, badlapur school reopening, pre primary section, student safety,
बदलापूर : ‘ती’ शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; पालकांशी संवाद सुरू, प्रशासकांच्या हालचाली
People Representative died , Nanded ,
पदावर असताना मृत्यू पावलेले नांदेडमधील सातवे लोकप्रतिनिधी !
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संताप व्यक्त करत रस्त्यांच्या प्रश्नाबाबत बोलत असताना इतर विषय का काढता? असा सवाल उपस्थित केला. “सुरतला कसे गेले, गुवाहाटीला कसे गेले? हा विषय आता कशाला काढता. मातोश्रीचे रस्ते कसे होते, हे दाखवून देऊ का? तुमचा विषय संपला आता”, असा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.

विधीमंडळात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असतानाच आदित्य ठाकरे यावेळी विधीमंडळाबाहेर आंदोलनात पुढाकार घेताना दिसत होते. महापुरुषांची बदनामी, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे निलंबन आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांवर घोषणाबाजी देण्याचे काम यावेळी आदित्य ठाकरे करताना दिसले. याआधी आदित्य ठाकरे स्वतः पुढाकार घेऊन घोषणा देत असल्याचे पाहण्यात आले नव्हते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे हे स्वतःच पुढे येताना दिसत आहेत.

२० डिसेंबरला विधीमंडळात सदर प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबर रोजी लोकसभेत बोलत असताना बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देशातील वाढत्या व्यसनाधीनतेचा प्रश्न मांडला. या प्रश्नावेळी बोलत असताना त्यांनी अचानक सुशांत सिंह राजपूतचे प्रकरण बाहेर काढले. “या प्रकरणात सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला आहे? १० जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतच्या लॅपटॉपशी छेडछाड झाली होती? रिया चक्रवर्ती ही महाराष्ट्रातील एका राजकारणाच्या संपर्कात होती? तिला AU नावाच्या व्यक्तीकडून ४४ फोन आले होते. बिहार पोलिसांच्या चौकशीत हे नाव आदित्य उद्धव असल्याचे समोर आले होते. मुंबई पोलिसांच्या तपासात हे नाव अनन्या उद्धव असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांचा निष्कर्ष वेगळा आहे.”, ही बाबा खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत मांडली.

आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी

लोकसभेत २१ डिसेंबर रोजी हा विषय मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे आमदार नितेश राणे हा विषय विधीमंडळात उचलून धरला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार का येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटपैकी एक होते. मातोश्रीला पेट्या पोहोचवण्याचे काम शेवाळे यांनी केले. म्हणूनच त्यांना एतके वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले गेले. जर मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधील एक माजी नेता हे आरोप करत असेल तर आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणात नार्को टेस्ट करा”, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील एनआयटी जमिन वाटप प्रकरण गाजत असताना अचानक आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप केल्यामुळे अधिवेशनाचा सूर बदलला. भाजप आमदार अमित साटम यांनी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली.

पूजा चव्हाण प्रकरणाचीही एसआयटीमार्फत चौकशी करा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटीची घोषणा होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचीही एसआयटी गठीत केली जावी, अशी मागणी उचलून धरली. आम्ही सत्तेत असतानाच दिशा सालियनचा मृत्यू झाला. त्यावेळी विरोधकांनीच हे प्रकरण सीबीआयकडे जावे, यासाठी आंदोलन केले. आता सीबीआयनेच तिची आत्महत्या झाली होती, असा निष्कर्ष काढल्यानंतरही त्यात एसआयटी नेमण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात त्यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मग आता या प्रकरणाचीही एसआयटी नेमावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विधानपरिषदेत राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याची घोषणा

एकडे विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण गाजत असताना तिकडे विधानपरिषदेत आ. मनिषा कायंदे यांनी राहूल शेवाळे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असल्याचे सांगत त्याची एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर बराच गदारोळ झाला. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाचीच गरमागरमी यावेळी अधिक दिसून आली. विरोधकांना नामोहरण करणे आणि सत्तांधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी शिळ्या कढीला ऊत आणत विरोधक आणि सत्ताधारी जुनेच विषय उकरुन काढत असल्याचे दिसलं.