नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जवळपास अर्धा डझन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले. हा निर्णय भाजपाच्या अंगलट आला आणि अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांचा पराभव झाला. भाजपाने २८ जागा लढविल्या आणि त्यांना केवळ नऊ ठिकाणी विजय मिळविता आला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत भाजपाने ताकही फुंकून प्यायची खबरदारी घेतल्याचे दिसते. त्यामुळेच पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा करत असताना भाजपाने ८० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “गुजरात आणि हरियाणामध्ये भाजपाने जवळपास अर्धे आमदार वगळले होते. याप्रमाणे आता महाराष्ट्रात मात्र फार काही बदल करण्यात आलेले नाहीत. फक्त काही मतदारसंघांत जिथे विद्यमान आमदाराचा विजय होणे अवघड वाटत आहे, तिथेच नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ४० आमदारांपैकी २३ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती, तर १७ आमदारांचे तिकीट कापले होते.

Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

हे वाचा >> घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

भाजपामधील अंतर्गत सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली की, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात विरोधी पक्ष अधिक बळकट आहे, त्यामुळे भाजपाला यंदा फार काही मोठे बदल करायचे नाहीत. तसेच आम्हाला बंडखोर आणि अपक्ष उमेदवार वाढवायचे नाहीत, असे विधान भाजपाच्या एका कॅबिनेट मंत्र्याने केले आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ ठिकाणी निवडणूक लढविली होती. त्यापैकी १०५ जागांवर त्यांचा विजय झाला. संयुक्त शिवसेनेने १२८ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना केवळ ५६ जागा जिंकता आल्या. यावेळी भाजपा १५० ते १५५ मतदारसंघात निवडणूक लढवू शकते, तर शिवसेना (एकनाथ शिंदे) ८० ते ८५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष ५०-५५ जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत जवळपास २५ आमदारांची नावे जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे हे सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर येत आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळालेले नाही, ते इतर पक्षात प्रवेश करत आहेत; तर काही जण अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे भाजपाच्या तिकिटावर कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांचा भाऊ निलेश राणेंना भाजपाने विधानसभेचे तिकीट दिले नाही. निलेश राणेंचा २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता, त्यामुळे निलेश राणे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करत असून ते कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कुडाळमध्ये सध्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे वैभव नाईक आमदार आहेत. याचप्रकारे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांचे सुपुत्र संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेतून तिकीट नाकारण्यात आले, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> हरियाणा इम्पॅक्ट, आरक्षण की लोकप्रिय घोषणा; महाराष्ट्र विधानसभेत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार?

भाजपाच्या काही नेत्यांनी “एक परिवार, एक उमेदवारी”, असा सूर लावला आहे; तर काही ठिकाणी एकाच घरातील दोघांना उमेदवारी मिळाली आहे. मुंबईत आशीष शेलार (वांद्रे पश्चिम) आणि विनोद शेलार (मालाड पश्चिम) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबद्दल भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून तीन ते चार इच्छुक उमेदवार असतात. शेवटी आम्हाला प्रत्येक मतदारसंघातून एकाची निवड करावी लागते, त्यामुळे सहाजिकच इतरांना निराश व्हावे लागते. आमच्या पक्षातले जे नेते बंडखोरी करतील त्यांना ३१ ऑक्टोबर पूर्वी अर्ज मागे घेण्याची विनंती केली जाईल, असेही या नेत्याने सांगितले.

कोणते उमेदवार बदलले?

भाजपाने श्रीगोंदा, फुलंब्री आणि चिंचवडमधील विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही. श्रीगोंदाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे, तर फुलंब्रीमधील आमदार हरीभाऊ बागडे हे राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतर या ठिकाणी अरुंधती चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली आहे; तर पुण्यातील चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना बाजूला करत त्यांचा दीर शंकर जगताप यांना तिकीट दिले आहे. तसेच कल्याण पूर्व येथे आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे.