भाजपाने बुधवारी (१० एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. या यादीत भाजपाने चंदिगड, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधील नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये चंदिगडमधून दोन वेळा विद्यमान खासदार राहिलेल्या किरण खेर यांच्याऐवजी चंदिगड भाजपाचे माजी प्रमुख व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बलराम दास टंडन यांचे पुत्र संजय टंडन यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु, विद्यमान खासदार किरण खेर यांना डावलून भाजपाने नवीन उमेदवाराला प्राधान्य का दिले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक उमेदवाराला प्राधान्य

लोकसभेच्या १० वर्षांच्या कार्यकाळानंतरही किरण खेर यांच्यावर ‘बाहेरील’ असल्याचा टॅग पुसला गेलेला नाही. गेल्या महिन्यातच खेर म्हणाल्या होत्या, “मी माझे कुटुंब आणि व्यवसाय सोडून, १० वर्षांपासून चंदिगडमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी आले आहे.” यंदा स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह होता. स्थानिक निवड समितीने केंद्रीय नेतृत्वाकडे चार नावे पाठविली होती. मात्र, चार नावांच्या या यादीत खेर यांच्या नावाचा समावेश नव्हता. चंदिगडमधील जनतेला यावेळी ‘स्थानिक उमेदवार’ हवा असल्याचे, स्थानिक नेत्यांचे सांगणे आहे.

Congress candidate Ravindra Chavan,
नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Nashik, election officer Nashik, vehicles election officer area,
नाशिक : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात तीन वाहनांनाच परवानगी, इच्छुक उमेदवारांना सूचना
Meeting with Rahul Gandhi today to review the election print politics news
निवडणुकीच्या आढाव्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे आज बैठक
Wardha, interview Congress candidates,
काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी
Vijay wadettiwar
“निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच मविआची उमेदवारी”, विजय वडेट्टीवारांचे विधान
chaos in badlapur thane over bjp candidate selection
ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !

चंदिगडच्या महानगरपालिका निवडणुकीचा परिणाम

चंदीगडमधील डिसेंबर २०२१ च्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप)बहुमत मिळाले होते. या निकालाने अनेक गोष्टी बदलल्या. चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आपचे १४ नगरसेवक विजयी झाले, तर भाजपाची संख्या २०१६ मध्ये जिंकलेल्या २० जागांवरून १२ वर आली.

भाजपाने उमेदवारी दिलेले संजय टंडन कोण आहेत?

संजय टंडन हे चंदिगड भाजपाचे सर्वांत जास्त काळ अध्यक्षपद भूषविणारे नेते आहेत. ते २०१० ते २०१९ पर्यंत चंदिगड भाजपाचे अध्यक्ष होते. टंडन यांच्या कार्यकाळातच पक्षाने लोकसभेची निवडणूक तसेच चंदिगड महानगरपालिका निवडणूक जिंकली होती. त्यानंतर पक्षाने टंडन यांना हिमाचल प्रदेश भाजपाचे सहप्रभारी म्हणून नियुक्त केले. टंडन यांचे वडील बलराम दास टंडन हे आजीवन संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी १९६९ ते १९७० पर्यंत पंजाबचे उपमुख्यमंत्री पद भूषवले. त्यानंतर २०१४ ते २०१८ दरम्यान ते छत्तीसगडचे राज्यपाल राहिले.

संजय टंडन हे चंदिगड भाजपाचे सर्वांत जास्त काळ अध्यक्षपद भूषविणारे नेते आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काँग्रेसच्या पवन बन्सल यांनी १९९९ पासून सलग तीन वेळा चंदिगड ही जागा जिंकली होती. २०१४ मध्ये भाजपाने खेर यांना चंदिगडमधून उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना या निवडणुकीत विजय मिळाला. २०१९ च्या निवडणुकीतही लोकांनी त्यांना निवडून दिले. २०१४ ची निवडणूक ही किरण खेर यांची पहिलीच निवडणूक होती. त्यांच्या कार्यकाळाबद्दल विचारले असता, फेडरेशन ऑफ सेक्टर वेल्फेअर असोसिएशन ऑफ चंदिगडचे अध्यक्ष बलजिंदर सिंह बिट्टू यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “शहरातील कोणत्याही प्रलंबित समस्यांचे निराकरण झालेले नाही. व्यापाऱ्यांना त्रास होत आहे, तसेच हाऊसिंग बोर्डाच्या रहिवाशांसाठीही त्यांनी काही केलेले नाही. त्यांना मिळालेला संपूर्ण निधी त्यांनी क्षुल्लक नागरी कामांवर खर्च केला. स्थानिक उमेदवार जेव्हा तुमचा खासदार असतो तेव्हा परिस्थिती वेगळी असते, असे ते म्हणाले.

गेल्या १० वर्षांत मतदारसंघात कोणतेही उल्लेखनीय काम झालेले नाही, असा आरोप त्यांनी केला. बिट्टू हे खेर यांच्या अनुपलब्धतेबद्दलही बोलले, ते म्हणाले, “लोक त्यांना भेटूच शकले नाहीत. चंदिगडमध्ये त्या क्वचितच असायच्या. यंदाही त्यांना उमेदवारी दिली असती, तर लोकांनी त्यांना मतदान केले नसते. लोकांना स्थानिक उमेदवार हवा होता,” असे त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाई

फेब्रुवारीमध्ये चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान पीठासीन अधिकारी अनिल मसीह हे भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी ‘आप’ आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची मते अवैध ठरविताना सुरक्षा कॅमेऱ्यात पकडले गेले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कडक शब्दांत फटकारले होते. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी हे मान्य केले की, त्यांनी मतपत्रिकेशी छेडछाड केली. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अवघ्या एक महिन्यापूर्वी हा प्रकार घडल्यामुळे पक्ष अडचणीत आला. यांसारख्या नकारात्मक गोष्टींचा लोकांना विसर पडावा म्हणून उमेदवार बदलणे हे कुठे न कुठे भाजपासाठी फायद्याचे ठरेल आणि आगामी निवडणुकांसाठीही ते सकारात्मक ठरेल.

हेही वाचा : भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

केवळ मोदी लाटेमुळे किरण खेर यांचा विजय

वर्षानुवर्षे टंडन यांचे चंदिगडमधील कार्य आणि दूरदृष्टी बघता, पक्षाने त्यांना ही संधी दिली आहे. दुसरीकडे खेर यांनी आजारी असल्याचे कारण सांगत, पक्षातून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. खेर यांना २०१९ मध्ये केवळ मोदी लाटेमुळे दुसरी संधी मिळाल्याचे स्थानिक भाजपा नेत्यांनी सांगितले आहे. खेर यांना आणखी एक संधी मिळाली, तर ती मोदी लाटेमुळेच मिळाली होती. २०१९ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी येथे एका रॅलीला संबोधित केले, तेव्हा त्यांनी स्वतःला मतदान करण्यास सांगितले होते. मात्र, खेर यांचा एकदाही उल्लेख केला नव्हता,” असे केंद्रशासित प्रदेशातील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.