सुजित तांबडे

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणेकरांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना विजयी करून भाजपचा गर्वाचा फुगा फोडला आणि पुणेकर हे ‘सुधारणावादी’ असल्याचे दाखवून दिले. मतदारांचा कल विचारात न घेता उमेदवार ‘लादला’ तर काय होते, हे भाजपच्या पारंपरिक ‘पेठां’तील मतदारांनी दाखवून भाजपला धडा शिकविल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र…पण कसब्यात रवींद्र!’ ही महाविकास आघाडीची घोषणा प्रत्यक्षात अवतरल्याने राज्याच्या आगामी काळातील राजकारणाला दिशा देणारा हा निकाल ठरला आहे.

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
bjp guardian minister nashik marathi news
जल्लोषातून पालकमंत्रिपदावर दावा, भाजपची अजित पवार गटाला शह देण्याची तयारी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने केलेले एकजुटीने काम धंगेकर यांच्या पथ्यावर पडले असून, भाजचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारीमुळे पेठांतील मतदारांची नाराजी उफाळून आल्याने भाजपला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा… Kasba Chinchwad Bypoll Election Result Live: कसब्यात विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझं हिंदुत्व…!”

कसबा निवडणूक ही राज्याच्या आगामी काळातील राजकारणाला दिशा देणारी ठरणार असल्याने या मतदार संघातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते निम्म्या मंत्रिमंडळाने पुण्यात ठिय्या मारूनही भाजपच्या पदरी लाजीरवाणा पराभव आला आहे.

हेही वाचा… Kasba Bypoll Election Result 2023: कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात सरळ लढत असल्याने निवडणुकीचा निकाल हा रंगतदार असणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात या मतदार संघाच्या टपाली मतदानापासूनच धंगेकर यांनी आघाडी घेतली. त्यानंतर झालेल्या पहिल्या फेरीतच धंगेकर यांनी सुमारे तीन हजार मतांनी आघाडी घेतली आणि निकालाचा कल सर्वांच्याच लक्षात आला होता. फेऱ्यांगणिक मताधिक्य हे वाढत गेले. या मतदार संघात मतमोजणीच्या २० फेऱ्या होत्या. त्यापैकी एकाही फेरीमध्ये रासने यांना धंगेकर यांच्यापेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत, यावरून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना डावलण्याचा भाजपचा निर्णय ‘पेठां’तील पारंपरिक मतदारांनी चुकीचा ठरविला. तसेच मतदारांना गृहीत धरू नका, हेदेखील मतदारांनी भाजपच्या लक्षात आणून दिले आहे. टिळक कुटुंबीयांऐवजी रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजपचा पारंपरिक मतदारही नाराज असल्याचे या निकालावरून निदर्शनास आले आहे. कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, लोकमान्यनगर, नवी पेठ हा भाजपचा हक्काचा मतदार मानला जातो. या भागातील मतमोजणी सुरू झाल्यावरही रासने यांना एकाही फेरीत धंगेकर यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली नसल्याने रासने यांना भाजपच्या मतदारांनी पूर्णपणे नाकारत भाजपलाही धडा शिकवला आहे.

हेही वाचा… चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे कायम

भाजपचे काय-काय केले?

कसबा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भाजपने निम्मे मंत्रिमंडळ कामाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण मांडले होते. मतदानाच्या दिवशी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून दबाव आणल्याचेही आरोप झाले. वातावरण निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी कसब्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आणले. आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांचा प्रचारासाठी वापर केला. साम, दाम, दंड यांचा पुरेपूर वापर करण्यात आला. मात्र, पुणेकर मतदारांनी बदललेल्या भाजपला त्यांची जागा दाखवून मूळ रुपात येण्याची सूचना या निकालाने दिली. मतदार हाच लोकशाहीत राजा असतो, हेदेखील पुणेकर मतदारांनी दाखवून दिले.

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या आमदाराची जवळीक आणि भाजपमधील वाढती अस्वस्थता

रासनेंविरूद्ध नाराजी?

टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने हेमंत रासने यांना दिलेली उमेदवारी, ही भाजपच्या पारंपरिक मतदारांना रुचली नाही. तसेच रासने यांनी सलग चारवेळा पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांनाच आमदारकीसाठी उमेदवारी दिल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी होती. त्यामुळेच भाजपबहुल या मतदार संघात एकाही प्रभागात रासने यांना मताधिक्य मिळू शकले नसल्याची चर्चा आहे. रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कार्यकर्ते असले, तरी या मंडळामध्येच पडलेली फूटही त्यांच्यासाठी अडचणीची ठरली.

हेही वाचा… Kasba By Poll Election Result 2023 : कसब्यातील पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपाचे हेमंत रासने म्हणतात, “माझ्या दृष्टीने हा निकाल…!”

धंगेकरांना लोकसंपर्क पथ्यावर

रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे एकाच परिसरातील नगरसेवक आहेत. धंगेकर हे पूर्वभागाचे, तर रासने हे पेठांच्या भागाचे नेतृत्त्व करतात. धंगेकरांचा सर्व पक्षातील लोकसंपर्क हा त्यांच्या पथ्यावर पडला. त्यांनी यापूर्वी तीनवेळा या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्या अनुभवाचाही त्यांना फायदा झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रासने यांना पाठिंबा दिला. मात्र, धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक असल्याने मनसेची अंतर्गत साथ धंगेकर यांनाच लाभल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

‘ब्राह्मण’ उमेदवारही नाकारला

हिंदू महासंघाचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी ‘ब्राह्मण’ उमेदवार असा प्रचार केला. मात्र, कसब्याचे सुज्ञ मतदार हे संकुचित विचारांचे नसल्याचेही दिसून आले. कारण दवे यांना १५० मतेही मिळू शकली नाहीत.

Story img Loader