गेल्या तीन दशकांप्रमाणेच यंदाही भाजपाचे अनुभवी खासदार संतोष गंगवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला बरेली येथून लढण्यासाठी तयारी करीत होते. पण गेल्या महिन्यात होळीच्या दिवशी पक्षाने यादी जाहीर केल्यावर त्यांना धक्का बसला. संतोष गंगवार यांच्याऐवजी माजी राज्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच बरेली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संतोष गंगवार यांच्याशिवाय होत आहे. २००९ चा अपवाद वगळता याच जागेवरून संतोष गंगवार यांनी आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आणि २००९ मध्ये त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराकडून केवळ ९ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भाजपा नेतृत्वाने संतोष गंगवार यांचे वय लक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे या जागेवरील लढत रंजक होत आहे. भारतीय जनता पक्षाने संतोष गंगवार यांच्या जागी छत्रपाल सिंह गंगवार यांना उमेदवारी दिली आहे. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकलेल्या प्रवीणसिंह आरोन यांना सपाने तिकीट दिले आहे. बसपाने छोटेलाल गंगवार यांना येथे तिकीट दिले होते, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपाल सिंह गंगवार यांना होणार आहे. कुर्मी मतांची जी विभागणी बसपा उमेदवारामुळे झाली असती ती आता होणार नाही. त्यामुळेच येथील लढत रंजक असली तरी या कुर्मीबहुल जागेवर भाजपाचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा