चंद्रशेखर बोबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्याच्या वेळी एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहून एकजुटीचे दर्शन घडवणारे स्थानिक भाजप नेते प्रत्यक्षात परस्परांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करण्यातच अधिक व्यस्त दिसतात. त्यामुळेच पक्षाला विधान परिषदेच्या निवडणुकीत दारून पराभवाला तोंड द्यावे लागले. नेत्यांमधील गटबाजी व कार्यकर्त्यामध्ये स्थिरावलेपणा आला की काय होते याचे जिवंत उदाहरण हे नागपूर शहर काँग्रेस आहे. या पक्षाची वाताहात होताना फडणवीस यांनी पाहिली आहे. सध्या शहर भाजपची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्यानेच फडणवीस यांनी नागपूर भाजपची काँग्रेस होऊ नये, अशी भीती व्यक्त केली असावी, अशी चर्चा फडणवीस यांच्या नागपूर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतील भाषणा संदर्भात राजकीय वर्तुळात आहे.
शुक्रवारी दुपारी नागपुरात भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात आले. त्यांचा फुटाळा तलावावर कार्यक्रम झाला. तेथे पक्षाचे सर्व प्रमुख बडेनेते एका रांगेत शहा यांच्या स्वागताला उपस्थित होते. नेत्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारे हे चित्र होते. पण प्रत्यक्षात स्थिती अशी नाही. खरे चित्र काय आहे हे फडणवीस हे या कार्यक्रमाला येण्यापूर्वी शहर भाजपच्या कार्यकारिणीत मांडले होते. “ पक्षातील गटबाजीने डोके वर काढले आहे, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे, वेळीच सुधारणा झाली नाही तर भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. मी गृहमंत्री आहे. कोण काय करते यांची सर्व माहिती मला असते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान बोलके आहेत.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता पर्याय कोणते?
फडणवीस यांच्या भाषणातील मुद्यांवर नजर टाकल्यास त्यांच्या मनातील तळमळ लक्षात येते. विधान परिषदेतील पराभव भाजपच्या किती जिव्हारी लागला याची प्रचिती येते. संघटनेचे भक्कम पाठबळ, पैसा आणि त्याला सत्तेची जोड असतानाही भाजपने पदवीधरपाठोपाठ शिक्षकचा बालेकिल्लाही गमावला. त्याला कारणीभूत ठरली ती पक्षातील गटबाजी. गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा पराभव होतो व तोही अत्यंता दारून यातून संपूर्ण राज्यभर चुकीचा संदेश गेला आहे. फडणवीस हे स्वत: गृहमंत्री असल्याने पराभवाची कारणे त्यांना माहिती असावी . म्हणूनच त्यांनी अंहकार सोडा नाही तर काय होईल याकडेही लक्ष वेधले. भाजपची काँग्रेस होईल ही व्यक्त केलेली भीती ही त्याच अनुषंगातून आलेली आहे, असे भाजपमधील जुने नेते सांगतात.
भाजपमध्ये मतभेद नाहीत, शिस्तीने चालणारा पक्ष आहे, असा दावा नेते करीत असले तरी काँग्रेस प्रमाणेच या पक्षातही गटबाजी आहे. फक्त ती काँग्रेसप्रमाणे उघडपणे केली जात नाही, तर ती छुप्या पद्धतीने होते. शिक्षक मतदारसंघातील पराभव हा छुल्या गटबाजीचाच परिणाम होता. त्यापूर्वी पदवीधरमध्येही असाच प्रकार झाला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीच्याद-ष्टीने कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावणे आवश्यक होते. ते फडणवीस यांनी केले. गटबाजीमुळे नागपूरमध्ये काँग्रेसची कशी वाताहात झाली हे विरोधीपक्षाचा नेता म्हणून फडणवीस पाहात आले आहेत.सध्या शहर भाजपची वाटचाल काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकणारी आहे हे फडणवीस यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी भाजपची काँग्रेस होऊ नये अशी भीती व्यक्त केली असावी ,अशी चर्चा आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यात घोषणांचा पाऊस पण कापूस दरवाढीवर मौन
शहर भाजपच्या डोळ्यात अंजन
फडणवीस यांचे भाषण शहर भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. भाजपची निवडणूक यंत्रणा किती सजग आहे हे कागदोपत्री दिसून येते. बुथ कार्यकर्ते, मतदार यादीतील प्रत्येक पानासाठी वेगळा कार्यकर्ता नियुक्त केल्याचे सांगितले जाते. यातून पक्षाच्या निवडणूक तयारीचा अंदाज बांधला जातो. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे हे फडणवीस यांनी बैठकीत मांडून पक्षातीलच बेशिस्तीवर प्रकाश टाकला. “ माझं व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष आहे. त्यामुळे कुणीही असं समजू नका मी लक्ष देत नाही. जे माजी आहेत त्यांना आजी नगरसेवक व्हायचं आहे. अनेकांचा व्यवहार मालक आहोत असा आहे. हे चालणार नाही. काही जण नेत्यांची माणसं आहेत. आपला स्वतःचा सवतासुभा आहे त्यांना पक्षाशी काही घेणंदेणं काही नाही. असं बिलकुल चालणार नाही हे लक्षात ठेवा ” असे फडणवीस म्हणाले.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या तयारी विषयी कार्यकर्ते व नेत्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वात पक्ष नेहमीच भक्कमपणे वाटचाल करीत आला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदाच होईल”
– चंदन गोस्वामी, प्रवक्ते भाजप