Kangana Ranaut farmers protest remarks : बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेच्या खासदार कंगना रणौत आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्या आक्रमक विधाने करीत असतात. पण, यावेळी भाजपाने पहिल्यांदाच त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. कंगना रणौत सध्या दुहेरी संकटात सापडल्या आहेत. एका बाजूला त्यांचा इमर्जन्सी हा चित्रपट वादात अडकला असून, त्यावरून त्यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी केलेले एक विधान वादाच्या केंद्रस्थानी आहे. या विधानापासून भाजपाने आता जाहीर फारकत घेतली असून, कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असे स्पष्टीकरणही पक्षाने दिले आहे.

कंगणौ रणौत यांच्या विधानापासून फारकत का?

कंगना रणौत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, २०२०-२१ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. या विधानानंतर विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले. कंगना रणौत यांचे विधान हे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा अवमान करणारे असून, त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर भाजपाने कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक बाबीवर विधान करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. हरियाणा विधानसभा निवडणुकीला केवळ एक महिना उरला असल्याने भाजपाने रणौत यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली असल्याचे बोलले जाते. हरियाणातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होते.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

हे वाचा >> Kangana Ranaut BJP: “कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणावर बोलण्याचा अधिकार नाही”, भाजपानं केलं स्पष्ट; ‘ते’ विधान भोवलं!

मुंबईत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ कंगना रणौत यांनी रविवारी (२५ ऑगस्ट) आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केला. या व्हिडीओत त्या म्हणाल्या, “शेतकरी आंदोलनाच्या वेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते, तर बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागला नसता. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी मृतदेह लटकले होते, त्या ठिकाणी महिलांवर बलात्कार झाले. जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे तीन कृषी कायदे सरकारने मागे घेतले, तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला. हे कृषी कायदे मागे घेतले जातील, असे आंदोलनकारी शेतकऱ्यांना अजिबात वाटले नव्हते. शेतकरी आंदोलनाच्या आड मोठे षडयंत्र रचले जात होते. त्यामागे चीन, अमेरिका यांसारख्या विदेशी शक्तींचा हात होता.”

कंगना रणौत यांच्या विधानामुळे वाद उद्भवताच भाजपाकडून निवेदन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये म्हटले गेले, “खासदार कंगना रणौत यांनी केलेले विधान हे पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यांच्या विधानाचा पक्षाशी काहीही संबंध नाही. पक्षाकडून त्यांना अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार नाही. भाजपा सामाजिक सौहार्द आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास’ या तत्त्वावर विश्वास ठेवतो.

हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तत्काळ कंगना रणौत यांच्या विधानावरून हात झटकले असल्याचे बोलले जाते. १ ऑक्टोबर रोजी हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणात फटका बसला होता. २०१९ साली त्यांना हरियाणात १० जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी फक्त पाच जागा जिंकण्यात त्यांना यश मिळाले. हरियाणामध्ये शेतकरी चळवळ प्रभावशाली आहे. त्यामुळे कंगना रणौत यांच्या विधानामुळे पसरलेल्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये, याची काळजी घेतली जात आहे.

हे ही वाचा >> Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

पंजाब भाजपाकडूनही विधानाचा निषेध

हरियाणाबरोबरच पंजाबचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनीही रणौत यांच्याविरोधात मत व्यक्त केले. ते म्हणाले की, शेतकरी आणि पक्ष यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. पक्षाने खासदार रणौत यांना फटकारले, ते चांगलेच झाले. मात्र, ही भूमिका खूप आधीच घ्यायला हवी होती. अशा विधानांचा थेट विपरीत परिणाम केवळ पंजाबमधीलच नाही, तर संपूर्ण शेतकरी वर्गावर होत असतो. एखाद्या विषयाबाबत मतमतांतरे असू शकतात; पण त्यासाठी संपूर्ण घटकाला कुणीही दोषी मानता कामा नये.

राहुल गांधींकडूनही टीका

खासदार कंगना रणौत यांचे विधान समोर आल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केलेली नाहीत आणि आता त्यांची प्रचार यंत्रणा शेतकऱ्यांचा अवमान करीत आहे. दिल्लीच्या सीमेवर ३७८ दिवस चाललेल्या सर्वांत मोठ्या आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी बलात्कारी आणि विदेशी शक्तींचे हस्तक म्हणून काम करीत होते, असे विधान करून भाजपाने शेतकरीविरोधी धोरणाचा हेतू स्पष्ट केला आहे.”

Vishal Dadlani offer work to CISF kulwinder kaur
कुलविंदर कौरने विमानतळावर कंगना रणौत यांना कानशिलात लगावली.

कंगना रणौत यांची वादग्रस्त विधाने

शेतकरी किंवा इतर विषयांवर वादग्रस्त विधान करण्याची खासदार कंगना रणौत यांची ही पहिलीच वेळ नाही. दोन महिन्यांपूर्वीच चंदिगड विमानतळावर महिला सीआयएसएफ कर्मचाऱ्याने कंगना रणौत यांच्या कानशि‍लात लगावली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबाबत अपशब्द काढल्यामुळे सदर कर्मचारी संतप्त झाल्याचे कारण समोर आले होते.

२०२० मध्ये शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत हीच वृद्ध महिला सीएएच्या विरोधातील आंदोलनात सहभागी असल्याचा आरोप रणौत यांनी केला होता. तसेच त्या १०० रुपयांत उपलब्ध होतात, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगना रणौत यांच्यावर टीका झाली होती. शाहीन बाग येथे सीएएच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या बिल्किस बानो आणि शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या वृद्ध महिला वेगवेगळ्या असल्याचे सोशल मीडिया युजर्सनी लक्षात आणून दिल्यानंतर कंगना रणौत यांनी वादग्रस्त पोस्ट डिलिट केली होती.

त्याचबरोबर सप्टेंबर २०२० मध्ये कंगना रणौत यांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे शिवसेना, संजय राऊत आणि त्यांच्यात खटके उडाले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबईत ड्रग्ज माफिया सक्रिय असल्याची टीका कंगना रणौत यांनी केली होती.

२०२१ साली कंगना रणौत म्हणाल्या की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. २०१४ रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले. या विधानावर टीका करताना काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी कंगना रणौत यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली.