सक्तवसुली संचनालयाकडून ( ईडी) कडून आतापर्यंत राज्यातील १३ पेक्षा जास्त नेत्यांविरोधात वा त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात समन्स, चौकशा, मालमत्तांची जप्ती आणि अटकेचा बडगा उगारण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर आतापर्यंत ईडीने दोनदा छापे घातले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सर्वप्रथम ईडीने ताब्यात घेतले होते. तब्बल दोन वर्षांनंतर भुजबळ यांची जामीनवर सुटका झाजली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १ वर्षांनंतर जामीनवर सोडण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कारवाईत अटकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे पुण्यातील माजी आमदार अनिल भोसले यांना पुणे सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली होते. तेव्हापासून ते कारागृहात आहेत.
हेही वाचा- राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. चौकशीसाठी हजर राहण्याचे फर्मान काढले होते. मात्र पवार यांनी ईडीलाच आव्हान देत ‘मी चौकशीसाठी कार्यालयात येतो मात्र त्यानंतर काही घडले तर त्याला तुम्ही जबाबदार ‘अशी रोखठोक भुमिका घेतल्यावर तत्कालीन फडणवीस सरकारची पंचाईत झाली होती. प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रीय यंत्रणांनी नोटीस बजाविली होती.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात आयकर विभागाने तीन दिवस छापे टाकले होते. तसेच ईडीच्या नोटीसा अजित पवार यांना आल्या होत्या. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक, पत्नी मंदाकिनी खडसे यांना बजावले समन्स बजावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना देखील ईडीने नोटीस पाठवली होती. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना देखील ईडीने नोटीस पाठवली होती.
हेही वाचा- भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर शिवसेनेच्या नेते ईडीच्या रडारवर होते.शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना ईडीच्या नोटीसा यायला सुरूवात झाली. त्यांतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फुट पाडून उद्धव ठाकरे यांचे सरकार घालवले.व स्वत्ता मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ज्या खासदार ,आमदार यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या त्या सगळ्यांनी शिवसेना सोडल्याचे चित्र आहे. यामध्ये माजी खासदार आनंदराव अडसुळ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव व त्यांचे पती मुंबई महापालिका नगरसेवक यशवंत जाधव,माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा समावेश आहे.
हेही वाचा- चंद्रकांत खैरे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत!
तर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. आता ते जामीनवर सुटले आहेत. माजी मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीसा पाठवून स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना सुद्धा ईडीने नोटीसा पाठवलेल्या आहेत.