गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची भेट झाली. ही भेट दोन आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात असली तरी या भेटीला काही नेत्यांकडून राजकीय रंग देण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार परत आरजेडीबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत की काय? अशी जोरदार चर्चाही बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माध्यमांसमोर येऊन त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं.

माध्यमांशी बोलताना, जेडीयू एनडीएबरोबर आहे आणि भविष्यातही आम्ही एनडीएबरोबरच राहू. पुन्हा आरजेडीबरोबर युती करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली. पुढे बोलताना, जी चुकी आम्ही काही वर्षांपूर्वी केली, ती चुकी आम्ही परत करणार नाही, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांची ही प्रतिक्रिया भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
ajit pawar bjp seat sharing assembly election
महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”

हेही वाचा – RSS सरकार्यवाह होसबळेंची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी भेट, पूरम उत्सवात गोंधळ आणि भाजपाचा विजय – काँग्रेसचा गंभीर आरोप!

मुळात आपण एनडीएबरोबर आहोत, याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ जेडीयूवर यावी, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. यापूर्वी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याचा व्हिडीओ पुढे आला होता. तेव्हाही नितीश कुमारांच्या एनडीएबरोबर राहण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. अखेर जेडीयूला माध्यमांसमोर येऊन त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

खरं तर अशा प्रकारे वारंवार स्पष्टीकरण देणं आणि त्याद्वारे विरोधकांना गोंधळात ठेवणं, हा नितीश कुमारांच्या राजकारणाचा भाग असल्याचं बोललं जातं. ज्यावेळी ते महागठबंधनमध्ये होते, त्यावेळी त्यांनी अनेकदा भाजपाच्या नेत्यांची भेट घेत चर्चेचे मार्ग खुले ठेवले होते. तसेच २०१७ ते २०२२ या काळात एनडीएमध्ये असताना त्यांनी आरजेडीच्या नेत्यांशीही संपर्क ठेवला होता.

हेही वाचा – Haryana Election 2024: भाजपाकडून हरियाणात घराणेशाही पॅटर्न; आठ उमेदवारांचा राजकीय वारसा

दरम्यान, नितीश कुमार यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, जेडीयूच्या एनडीएत येण्यामुळे भाजपाला रणनीतीत बदल करावा लागेल, असं ते म्हणाले. पुढे बोलताना, आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासंदर्भात पक्ष विचार करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच भाजपाने रणनीती बदलली असली तरी आगामी निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाची बाब म्हणजे आगामी निवडणुकीत आता बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे बिहारमधील सध्याची राजकीय समीकरणं बघता, भाजपाकडे नितीश कुमार यांना आपल्याबरोबर ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण, २०२५ च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमार एनडीएबरोबर राहतील की नाही, याबाबत भाजपा नेत्यांच्या मनात शंका आहे.