जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढताना वापरलेली वाघनखे लंडनमधून भारतात कधी येणार, याची माहिती प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे-पाटील यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागितली होती. परंतु माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार अशी माहिती देता येणार नसल्याचे संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यांना कळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघनखे करारपत्र, या संदर्भातील आवश्यक निर्णय, लंडनला जाण्याचा खर्च, वाघनखे कधी येणार या संदर्भात तपशीलवार माहिती या चार मुद्द्यांची माहिती लाखे-पाटील यांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांना मागितली होती. त्यावर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव तथा जनमाहिती अधिकारी सु. द. पाष्टे यांनी उत्तर पाठविले आहे.

हेही वाचा : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मनमानी वाढली ?

माहिती अधिनियमातील (२००५) कलम ८ (१) अनुसार ‘परकीय राज्यांसोबतच्या संबंधाला बाधा पोहोचेल अशी माहिती’ देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या अधिनियमाच्या कलम ८ (१) (च) अनुसार ‘विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळविलेली माहिती’ देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाघनखे करारपत्र, या संदर्भातील आवश्यक निर्णय आणि वाघनखे कधी येणार याबाबत विचारलेली माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे लाखे-पाटील यांना कळविण्यात आले आहे. या उत्तराने समाधान झाले नाही तर एक महिन्याच्या आत संबंधित अपिलीय अधिकाऱ्यांकडे करता येईल, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात मुलींच्या लग्नाच्या वयात बदल नाही; जाणून घ्या भाजपा आणि विरोधकांची भूमिका काय?

प्रवास खर्च किती झाला?

लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’मध्ये वाघनखे असून ती भारतात आणण्याच्या संदर्भात जात असल्याचे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाचे शिष्टमंडळ तेथे गेले होते. या वाघनखांच्या बद्दल काही अभ्यासकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात अभ्यासासाठी आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी आपण याबाबत माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागितली होती. त्यावर चारपैकी तीन मुद्द्यांवर माहिती देता येत नसल्याचे कळविण्यात आले आहे. लंडनला गेलेल्या शिष्टमंडळाच्या खर्चाबाबत शासकीय संकेतस्थळावरील संबंधित शासन निर्णय उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले. परंतु या संकेतस्थळावर लंडनला गेलेल्या शिष्टमंडळाच्या खर्चाची माहिती उपलब्ध नाही. – डॉ. संजय लाखे-पाटील, काँग्रेस प्रवक्ते

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why so much secrecy about tiger claws right to information print politics news css
Show comments