शिवाईनगर भागातील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार होता. या पक्ष प्रवेशासंबंधीचे फलकही शिवाईनगर परिसरात चव्हाण समर्थकांनी लावले होते. परंतु ऐनवेळेस त्यांचा पक्ष प्रवेश रद्द करण्यात आला. चव्हाण यांच्या प्रभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक समर्थक गेल्या निवडणुकीत निवडून आले असून सुलेखा यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गट आणि भाजपा यांच्यात विसंवाद असल्याचे चित्र समोर आले असते. यामुळेच तर सुलेखा यांचा भाजपा प्रवेश रखडला नाही ना, अशी चर्चा आता शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतांवर भाजपाचा डोळा

शिवाईनगर भागातील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. रिक्षा चालक ते नगरसेवक असा त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. त्यांनी चार वेळा स्थायी समिती आणि एकदा परिवहन समितीचे सभापती पदही भूषविले होते. प्रत्येक निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून येणे ही त्यांची खासियत होती. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच वेळा ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच अपक्ष म्हणून त्यांनी तिघांचे पॅनलही पालिकेवर निवडून आणले होते. मधल्या काळात त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यावेळेसही त्यांनी मनसेचे दोन नगरसेवक निवडून आणले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी असल्याच्या कारणावरून भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांच्या पक्ष प्रवेशास विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकला नव्हता. 

हेही वाचा- राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’त रायगडच्या नंदा म्हात्रेंचा सहभाग

भाजपाने प्रवेश नाकारल्यानंतर सुधाकर चव्हाण यांच्या पॅनलने प्रभाग क्रमांक ५ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीत त्यांचे अपक्षाचे पॅनल पराभूत झाले होते. या प्रभागातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे समर्थक नरेंद्र सुरकर, जयश्री डेविड, रागिणी बैरीशेट्टी, परिषा सरनाईक हे चार नगरसेवक निवडून आले होते. राज्यातील सत्ताबदलाआधी मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहाटी, गोवा येथे गेले होते, त्यावेळेस त्यांच्यासोबत नगरसेविका जयश्री डेविड यांचे पती जेरी हे होते. असे असतानाच मित्र पक्ष भाजपाकडून सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांना पक्ष प्रवेश देण्याची तयारी सुरू होती. पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सुलेखा चव्हाण यांचा पक्ष प्रवेशही निश्चित झाले होते. 

हेही वाचा- सुषमा अंधारेंच्या जळगाव दौऱ्यातून प्रबोधन कमी, विरोधकांना धडकीच अधिक

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी संघटनात्मक बांधणीसाठी ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुलेखा या पक्ष प्रवेश करणार होत्या. या पक्ष प्रवेशासंबंधीचे फलकही शिवाईनगर परिसरात चव्हाण समर्थकांनी लावले होते. परंतु ऐनवेळेस त्यांचा पक्ष प्रवेश रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक समर्थक नगरसेवक असलेल्या प्रभागातील सुलेखा चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला असता तर, यामुळे शिंदे गट आणि भाजपा यांच्यात विसंवाद असल्याचे चित्र समोर आले असते. यामुळेच तर सुलेखा यांचा भाजपा प्रवेश रखडला नाही ना, अशी चर्चा आता शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.