ठाणे : ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरुन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेच्या शुभारंभ सोहळ्यावरुन पुन्हा एकदा या दोन पक्षात वितुष्ट निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. शहरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टीएमटी सेवेत ५० टक्क्यांची सवलत द्या अशी मागणी मागील पाच वर्षापासून भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी लावून धरली होती. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्या हस्ते ठाणे स्थानकात या सेवेचा शुभारंभ करताना केळकर यांना मात्र आमंत्रणही पाठविण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ‘ठाण्यातील भाजप हतबल नाही आणि असा अपमान आता सहनही करणार नाही’ असा इशारा देत केळकरांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच अंगावर घेतल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा : सांगलीच्या निवडणूक आखाड्यात कृष्णेचे पाणी भाजपला त्रासदायक ठरणार ?
ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजपने आग्रह धरल्याने गेल्या काही दिवसांपासून या दोन पक्षात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. मागील वर्षभरापासून भाजप आमदार संजय केळकर, विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक या नेत्यांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. बैठका, सभा, दौरे काढत हा संपूर्ण मतदारसंघ भाजप नेत्यांनी या काळात ठरवून पिंजून काढला होता. असे असले तरी जागावाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल असे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असून मिरा-भाईदरच्या अपक्ष आमदारही पुर्वाश्रमीच्या भाजप पदाधिकारी होत्या. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पुर्वीच्या आताच्या शिवसेनेपेक्षा भाजपची या मतदारसंघातील ताकद अधिक असल्याचा या नेत्यांचा दावा होता. असे असतानाही मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव हा मतदारसंघ शिवसेनेकडे जात असल्याच्या चर्चेने भाजप नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असतानाच बुधवारी टीएमटी तिकीट दरातील सवलत योजनेच्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांना डावलण्यात आल्याने भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा : कुबेर भंडारी नांदेडमधील राजकीय नेत्यांचे नवे श्रद्धास्थान!
ठाण्यात भाजपसाठी केळकरांचे महत्व किती आहे ?
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे संजय केळकर मोठया मताधिक्याने निवडून आल्याचे पहायला मिळाले. ठाणे महापालिका हद्दीत विधानसभेच्या चार जागा आहेत. यापैकी दोन जागांवर शिवसेनेचे, कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात संजय केळकर हे आमदार आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रविंद्र फाटक यांचा पराभव करुन केळकर १३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले. ठाणे शहर, नौपाडा, पाचपाखाडी, चरई या भागातील संघनिष्ठ आणि पांढरपेशा मतदारांमध्ये भाजपचा चेहरा म्हणून केळकरांची वर्षानुवर्षे ओळख आहे. ठाणे महापालिकेच्या कारभारावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना युतीत असूनही आमदार केळकर यांच्यावर कोणतेही शिंतोडे उडालेले नाहीत हे विशेष. राज्यात आणि देशात युतीत असतानाही महापालिकेच्या चुकीच्या कारभाराविरोधात जाहीरपणे बोलणारा आमदार अशी केळकर यांची ख्याती आहे. बदलत्या राजकीय समिकरणात ठाणे जिल्ह्यात भाजपला अधिकचा वाटा मिळायला हवा आणि शिवसेनेपुढे आता अजिबात कच खाता कामा नये अशी जाहीर भूमीका मांडणारा आमदार म्हणून केळकर सतत चर्चेत राहीले आहेत. ठाणे शहर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून वगळले जात असल्याचे लक्षात येताच केळकर यांनी जाहीरपणे भूमीका घेत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेवर जोरदार शाब्दीक हल्ला चढविल्याने ते पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.