सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळविला. दुसऱ्या पसंतीच्या १३ व्या फेरीत २३ हजार ५८० मते घेऊन ते निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी किरण पाटील यांना १६ हजार ६४३ मते पडली. सहा हजार ९९७ मतांनी ते निवडून आल्यानंतरही त्यांच्या विषयी असणारी नाराजी अधिक हे मतांमधून दिसून आले. त्यांच्या कार्यशैलीवर पक्षांतर्गत आणि शिक्षकांमध्येही नाराजी होती. पण त्या नाराजीचे भाजपाला एकत्रिकरण करता आले नाही, परिणामी काळेच्या नाराजीची मते मराठवाडा शिक्षक संघांचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना मिळाली. चौथ्यांदा निवडून येणारे विक्रम काळे यांचा आता राष्ट्रवादीमध्ये या पुढे वरचष्मा राहील, असे चित्र दिसत असले तरी बोलण्या वागण्याच्या शैलीमुळे शिक्षकांचे लोकप्रतिनिधी एवढीच त्यांची प्रतिमा पक्षात कायम राहील, अशी व्यूहरचनाही या अवघड विजयातून करण्यात आल्याचे मानले जात आहे.

विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Indian Engineers
“एक कोटी रुपये पगार दिला तरी भारतीय इंजीनिअर्स आठवड्यातून सहा दिवस…” IITian सीईओची टीका
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
Chandrapur District Bank Recruitment , AAP ,
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची ‘ईडी’कडे तक्रार
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा

केंद्र सरकार जेव्हा सारा भर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर देत होते आणि त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होतील असा दावा करत होती तेव्हा त्या नव्या धोरणाचा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा म्हणून उपयोग करुन घ्यावा असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटले नाही. त्यांनी प्रचाराच्या भाषणांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाचा किंचितसा उल्लेख केला नाही. मग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने नक्की काय केले तर राष्ट्रवादीने ठरवून दिलेल्या मुद्दयाला उत्तरे देण्यातच वेळ घालवला. शाळांचे अनुदान, पेन्शन योजना, शिक्षक लाभाच्या योजनांमधील सरकारी दोष आणि ते दूर करण्यासाठी भाजपचे नेते कसे अपयशी ठरत आहेत, हे राष्ट्रवादीने ठसवायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने ठरविलेल्या राजकीय विधानांना उत्तर देताना आम्ही देखील त्या सुविधा देण्यास तयार आहोत, असा प्रचार भाजप नेत्यांनी केला. राष्ट्रवादीच्या सुविधा, अनुदानाच्या गुंतळयात भाजपा अडकल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत होते. खरे संघ परिवारातील अनेक जण शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करतात. यमगरवाडीसारख्या भटक्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या शाळा असो किंवा वंचिताच्या शिक्षणासाठी हाती घेतलेले विविध प्रकल्प असो. शिक्षक घडवावा लागतो हे परिवारातील धुरीणांना माहीत आहे. पण रा. स्व. संघ परिवातील विचार आता भाजपच्या राजकारणाचा भाग होऊच शकत नाहीत, किंबहुना आदर्शवत ठरू शकतील अशी कामे राजकीय व्यवस्थेपासून दूरच असावीत अशी राज्य भाजप नेत्यांची भूमिका असावी एवढे अंतर त्यात पडत जात असल्याचे दिसून आले. परिणामी शिक्षक मतदारसंघात आपल्याकडे उमेदवारही नाहीत आणि निवडून येण्याची क्षमताही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाही, या धारणेतून कॉग्रेसमधील एक उमेदवार आयात करण्यात आले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने लढवली जाते व तो आमदार भाजपाचा सहयोगी आमदार असतो. पण उमेदवार निवडताना भाजपच्या नेत्यांनी राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच उमेदवार ठरविला. त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये दिसून आले. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना पराभूत करायचे असेल तर त्यांच्या उणिवा, त्रुटी माहीत असणारे त्यांच्याच जिल्ह्यातील त्यांचे जुने सहकारी राणाजगजीतसिंह पाटील यांनी निवडणूक प्रमूख म्हणून नियुक्ती केली की भागेल असे सोपे उत्तर काढले. अर्थात नवख्या उमेदवाराच्या पाठिशी सर्व भाजप उभा आहे, असे संदेश देण्यात आले खरे पण त्याचा मतदारांवर परिणाम झाला नाही. जुनी पेन्शन योजना आणि अनुदान प्रश्नी भाजपचे नेत्यांनी आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी मूळ भूमिकेवरुन घुमजावही केले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

हेही वाचा… मोदींवरील माहितीपटावरून कोल्हापुरात पुरोगामी पक्ष – भाजपात संघर्ष

विक्रम काळे यांचा अवघड विजय

शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांनी या पूर्वी तीन वेळा विजय मिळविला होता. मराठवाड्यातील बहुतांश खासगी शाळांवर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्याचा वरचष्मा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ ही संस्था सर्वात महत्त्वाची. पदवीधर मतदारसंघाची स्वतंत्र बांधणी करणारे आमदार सतीश चव्हाण यांचा या संस्थेवर पगडा आहे. त्यामुळे विक्रम काळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावरच प्रामुख्याने होती. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे काम त्यांच्यावर सोपविले होते. या काळात विक्रम काळे यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांना बरोबर घेत अनेक बैठका सतीश चव्हाण यांनी घेतल्या. अजित पवार यांनी सभा घेतल्या. दाखविण्यापुरते का असेना शिवसेना नेते आणि कॉग्रेसच्य नेत्यांनाही व्यासपीठावर आणल्यानंतर जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा हा भाजप सरकारच्या नेत्यांचे अपयश असल्याचे पटवून देण्यात आले. खरे तर भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते दोन्ही मराठा जातीय ध्रुवीकरण होऊ नये याची काळजी भाजपने घेतली होती. पण गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या विक्रम काळे यांची प्रतिमा अधिक उजवी ठरली. पण सलग तीन वेळा निवडून आलेले विक्रम काळे यांच्या विषयी शिक्षकांमध्ये नाराजी होती, हे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. अन्यथा मराठवाडा शिक्षक संघाच्या उमेदवारास १४ हजार १२८ एवढी अधिक मते मिळालीच नसती.

हेही वाचा… Maharashtra Latest Breaking News Today : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघीडाचे वर्चस्व; अमरावतीच्या निकालाची अद्यापही प्रतीक्षा

शिक्षक संघटना एवढी मजबूत कशी ?

विक्रम काळे यांचे वडील वसंत काळे यांनी शिक्षक मतदारसंघात विजय मिळविण्यापूर्वी या मतदारसंघात मराठवाडा शिक्षक संघाचे वर्चस्व होते. राजभाऊ उदगीरकर, पी. जी. दस्तुरकर यांच्यासारख्या नेत्यांनी ही संघटना बांधली हाेती. गेल्या काही दिवस संघटनेत बरीच फूट पडल्याने शिक्षक संघटना काहीशी कमकुवत झाली होती. मात्र, उमेदवार निवडताना संघटनेने दाखविलेल्या समंजसपणाचा फायदा सूर्यकांत विश्वासराव यांना झाला. दोन मराठा उमेदवार आणि एक लिंगायत उमेदवार अशी पटमांडणी झाली. आरक्षण मागणीमुळे मराठवाड्यातील जातीय भावना तीव्र झालेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून लिंगायत मतांचे ध्रुवीकरण केले गेल्याचा आरोप आता राष्ट्रवादीचे समर्थकही करतात. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉग्रेसच्या नेत्यांनीही संघटनेच्या उमेदवारास साथ दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. शिक्षकांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष आपल्या हिताचा निर्णय घेणार नाहीत, हे कळून चुकल्याने मराठवाडा शिक्षक संघास अधिक मते मिळाली.

Story img Loader