आगामी महानगरपालिका, नगरपालिका वा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने (ठाकरे) यांनी केल्याने महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोेरे जाणार नाहीत हे स्पष्ट झाले. त्याच वेळी महायुती म्हणून लढण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी आधी घोषणा केल्याप्रमाणे अजित पवार गट स्वबळावर लढण्यावर ठाम आहे का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा वा विधानसभेला आमची भाजप व शिवसेनेबरोबर (शिंदे) महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर केली होती. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. यानुसार आमच्या पक्षाचा विस्तार करण्याकरिताच आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढू, असे अजित पवारांनी तेव्हा जाहीर केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा