अलिबाग – मंत्रिपदाच्या आशेवर अडीच वर्षे काढलेले शिवसेना आमदार भरत गोगावले यांची यंदा तरी इच्छा पूर्ण होणार का, याची रायगड जिल्ह्यात उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या अखेरच्या काळात गोगावले यांची एस. टी. मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण मंत्रिपद न मिळाल्याची सल त्यांच्या मनात कायम आहे.

शिवसेनेतील बंडानंतर जून २०२२ मध्ये राज्यात महायुती सरकारची स्थापना झाली. शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळू शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी दिल्याने, गोगावले पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या आशेवर राहिले. पण मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन बोळवण करण्यात आली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

हेही वाचा – राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

लवकरच मंत्रिपदावर आपली वर्णी लागेल असा आशावाद ते व्यक्त करत राहिले. त्यामुळे विरोधकांच्या टीकेचे ते धनीही ठरले. गोगावले यांच्या कोटाला उंदीर लागण्यापूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करा अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली होती. विरोधकांकडूनही या मुद्द्यावर त्यांना लक्ष्य केले गेले. तर सत्ताधाऱ्यांनी त्यांची अदृश्य पालकमंत्री म्हणून टिंगल केली. तरीही गोगावलेंनी मंत्री होण्याची इच्छा कधी लपवून ठेवली नाही. जाहीर कार्यक्रम असो अथवा पत्रकार परिषदा ते मंत्री होण्याची इच्छा सतत व्यक्त करत राहिले. कधी सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवालाच कौल लावयचा राहिला आहे म्हणत आपली अगतिकताही व्यक्त केली. माझ्या मंत्रिपदासाठी आता देवाला साकडे घाला असेही गावकऱ्यांना सांगून टाकले. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. ना देव मदतीला धावून आला ना एकनाथ शिंदे प्रसन्न झाले.

हेही वाचा – Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

नुकत्याच झालेल्या महाड विधानसभा मतदारसंघातून गोगावले पुन्हा एकदा २६ हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला. सलग चार वेळा निवडून येणारे ते मतदारसंघातील पहिलेच आमदार ठरले. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात आले. येत्या १२ डिसेंबरला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का आणि “देवाभाऊ” गोगावले यांच्यावर प्रसन्न होणार का याची उत्सुकता रायगडकरांना असणार आहे.

Story img Loader