भाजपाचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नल यांनी स्वपक्षीय नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर ४० हजार कोटी रुपयांचा कोविड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली. हाच मुद्दा पुढे करत काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि येडियुरप्पा यांचा धाकटा मुलगा बी. वाय. विजयेंद्र आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेल्या पक्षाच्या पहिल्याच बैठकीत बसनगौडा पाटील यत्नल यांच्यावर कारवाईसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटक भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये बहुतेक नेते येडियुरप्पा गटाशी संबंधित आहेत. त्या सर्वांच्या मते यत्नल यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास उशीर झाला आहे. यत्नल यांना पाठिंबा दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपासाठी नुकसान करणारं ठरेल आणि त्याचा फायदा सत्ताधारी काँग्रेसलाच होईल,” असं मत या भाजपा बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

कोविड साहित्य खरेदीमध्ये ४० हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्नाटकमध्ये कोविड साहित्य खरेदीमध्ये ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप यत्नल यांनी केला. यानंतर यत्नल जाणीवपूर्वक भाजपाचे नुकसान करण्यासाठी अशी विधानं करत असल्याचा आरोप काही भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

“अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करूनही यत्नल यांच्यावर कारवाई नाही”

नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजपा अधिकाऱ्याने सांगितलं, “आम्ही यत्नल यांच्या अपमानजनक दाव्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही. कारण ते पक्षात आहेत. त्यांच्या सातत्याने होणाऱ्या आरोपामुळे भाजपा दोषी ठरत आहे. आश्‍चर्य म्हणजे यत्नल यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करूनही पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.”

२,५०० कोटी रुपयांमध्ये मुख्यमंत्रीपदाची ऑफर

यावर्षी मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यत्नल यांच्या असंतुष्टतेमुळे भाजपाचं नुकसान झालं, असं राज्यातील भाजपाच्या अनेक नेत्यांना वाटतं. निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपा सरकारवर आरोप करत होता. त्यावेळी यत्नल यांनी त्यांना २,५०० कोटी रुपयांमध्ये मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तत्कालीन बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला घेरलं.

यत्नल यांना भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस

भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी यत्नल यांना त्यांच्या वक्तव्यावरून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्यांना कारवाई न करता सोडून देण्यात आले. या वर्षी जूनमध्ये कर्नाटक भाजपाने त्यांना आणखी एक नोटीस बजावली होती, परंतु यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

यत्नल कोण आहेत?

६० वर्षीय यत्नल येडियुरप्पा यांच्यासारखेच लिंगायत नेते आहेत. ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या गटातील आहेत. तीन वेळा आमदार असलेले यत्नल हे एकदा विधान परिषदेचे सदस्य आणि दोन वेळा खासदारही होते. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अनेक काँग्रेस आणि भाजपा नेत्यांनी हातमिळवणी करत त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याही वेळी यत्नल पुन्हा विजापूर मतदारसंघातून निवडून आले.

हेही वाचा : कर्नाटक : “येडियुरप्पांच्या सरकारमध्ये ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार”, यत्नल यांच्या आरोपामुळे भाजपा अडचणीत!

२००२-०४ दरम्यान यत्नल यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले. २०१० मध्ये त्यांनी भाजपा सोडून एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस पक्षात प्रवेश केला. तेथे त्यांना जेडीएसचा प्रदेशाध्यक्ष न बनवल्याने त्यांनी २०१३ मध्ये पुन्हा भाजपात प्रवेश केला.