पुणे : लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत विजय मिळवलेला भारतीय जनता पक्ष पुण्यात तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक करेल का, अशी चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. १९५१ पासून आजवर झालेल्या लोकसभेच्या १७ निवडणुकांमध्ये पुणेकरांनी विविध राजकीय विचारांना पसंती दिल्याचे दिसून येते. या निवडणुकांत सर्वाधिक म्हणजे ९ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र पुण्याने प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, जनता दल या पक्षांनाही निवडून दिले आहे. काँग्रेसचा देशात दबदबा असतानाच्या काळातही भाजपच्या अण्णा जोशी यांनी १९९१च्या निवडणुकीत पुण्यातून विजय मिळवला होता.

सलग तीनवेळा खासदार होण्याचा मान मात्र विठ्ठलराव गाडगीळ यांच्या कडे जातो. १९८०, ८४ आणि ८९ या तीनवेळच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. काँग्रेसचेच सुरेश कलमाडी यांनी २००४ आणि २००९च्या निवडणुकीत सलग विजय संपादन केला होता. त्यापूर्वी १९७१च्या निवडणुकीत मोहन धारिया यांना काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. आणीबाणीला विरोध करणाऱ्या त्यावेळच्या तरुण तुर्कांच्या तुकडीत समावेश असलेल्या धारिया यांनी १९७७ मध्ये जनता दलाच्या तिकिटावर विजय संपादन केला.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!

हेही वाचा : अपहरण प्रकरणातील दोषी निवडणुकीच्या रिंगणात? कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात ठोकला शड्डू

पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांनी दुसऱ्याच निवडणुकीत (१९५७) प्रजा समाजवादी पक्षाच्या ना. ग. तथा नानासाहेब गोरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर याच गोरे यांना १९८०च्या निवडणुकीत काकासहेबांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडून हार पत्करावी लागली. विठ्ठलराव गाडगीळांनी त्यानंतरच्या सलग दोन (१९८४, १९८९) निवडणुकांत विजय मिळवला. मात्र त्यानंतरच्या १९९१च्या निवडणुकीत भाजपच्या अण्णा जोशी यांना पुणेकरांनी निवडून दिले. याचवेळी भाजपचा पुण्यातून राष्ट्रीय प्रवेश झाला. तो नंतर १९९९च्या निवडणुकीत प्रदीप रावत यांच्या विजयाने पुन्हा अधोरेखित झाला. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत भाजपचे अनिल शइरोळे आणि गिरीश बापट यांना पुणेकरांनी निवडून दिले.

हेही वाचा : नगरमध्ये आरक्षणावर नामांतराची मात्रा

२०१४च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांना ५,६९,८२५ तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना २, ५४,०५६ मते मिळाली होती. २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊन गिरीश बापट यांना ६,३२,८३५ मते मिळाली, तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ३, ०८,२०७ मते मिळाली होती. मतांचा हा वाढता आलेख येत्या निवडणुकीतही असाच राहील किंवा नाही, याबद्दल आता कुतूहल निर्माण झाले आहे.

हेही वाचा : भाजपकडून लोकसभेसाठी पाच महिलांना उमेदवारी, पूनम महाजन यांच्यावर टांगती तलवार

यंदा होणाऱ्या निवडणुकीत भाजप तिसऱ्यांदा निवडून येईल काय, या प्रश्नाचे उत्तर विरोधकांचा उमेदवार कोण असेल, यावर अवलंबून असेल. महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्याने त्या पक्षाकडे खंद्या उमेदवाराची वानवा आहे. त्या पक्षातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना पुणेकर किती साथ देतात, यावर यंदाच्या निवडणुकीचे फलित अवलंबून असेल.