सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रमुख अडथळा मानल्या गेलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी सोलापूर महापालिकेने अखेर पाडून टाकली. शहर व आसपासच्या दोन-तीन तालुक्यांतील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर परिणाम होणाऱ्या या चिमणी पाडकामाचा फटका प्रामुख्याने सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिमणीचे राजकारण भाजपच्या दृष्टीने जुगार ठरला असून यात लाभ किती आणि तोटा किती, हे नजीकच्या काळात दिसून येणार आहे.

दुसरीकडे चिमणीच्या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला म्हणजे महाविकास आघाडी किती आक्रमक पद्धतीने भाजपच्या विरोधात वातावरण पेटवत राहणार? यात राजकीय लाभ किती घेता येणार, हेसुद्धा नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचविण्याच्या दृष्टीने होटगी रस्त्यावरील जुन्या छोटेखानी विमानतळाला भक्कम पर्याय म्हणून बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची उभारणी प्राधान्यक्रमाने होण्यासाठी स्वतंत्र व्यापक जनआंदोलन उभारण्याची संधी महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेसने गमावली आहे. सिद्धेश्वर कारखाना चिमणी बचाव, बोरामणी विमानतळ विकास संघर्ष समितीनेही आपले अपयश सिद्ध केले आहे. अर्थात, आता चिमणी पाडल्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला सुमारे चारशे कोटी रुपयांचा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. शिवाय ३८ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प बंद होणार आहे. एवढेच नव्हे तर कारखान्याची ऊस गाळप क्षमता दहा हजार मे. टनावरून जेमतेम चार हजार मे. टनापर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा कारखाना आणखी रसातळाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यात कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांना सहानुभूती मिळणार की त्यांना खलनायक ठरविण्याचा खटाटोप काडादीविरोधक भाजप नेत्यांकडून होणार, हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळणार आहे. शेवटी कोण जिंकले, याचा फैसला आगामी काळात होईल.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा – तेलंगणामध्ये BRS पक्षाचे आमदार IT विभागाच्या रडारवर! निवडणुकीच्या तोंडावर कारवाई झाल्यामुळे भाजपावर गंभीर आरोप!

गेली ५० वर्षे यशस्वीपणे वाटचाल करणारा सिद्धेश्वर साखर कारखाना वीरशैव लिंगायत समाजाचा मानबिंदू समजला जातो. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आणि तुळजापूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याची उभारणी दिवंगत माजी खासदार मडेप्पा बंडप्पा ऊर्फ आप्पासाहेब काडादी यांनी केली होती. काडादी घराण्यातील चौथी पिढी कारखान्याची धुरा सांभाळत आहे. सुमारे २७ हजार सभासद शेतकरी आणि ११०० कामगारांचा उदरनिर्वाह याच कारखान्यावर अवलंबून आहे. या कारखान्याची धुरा वाहणाऱ्या काडादी कुटुंबियांकडेच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानासह सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संस्था, सिद्धेश्वर कर्करोग रुग्णालय व संशोधन संस्था, संगमेश्वर महाविद्यालय आदी नामवंत संस्थांचा वर्षानुवर्षे ताबा आहे. या सर्व संस्था वीरशैव लिंगायत समाजाची शक्तिस्थाने समजली जातात. राजकारणापासून दूर असलेल्या गर्भश्रीमंत काडादी घराण्यावर लिंगायत समाजाने वर्षानुवर्षे विश्वास दर्शविला आहे. ही विश्वासार्हता काडादी कुटुंबियांनी कधीही खंडित होऊ न देता कायम जपली आहे.