मोहनीराज लहाडे

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे पुन्हा रिंगणात असून, भाजपने उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. मतदार नोंदणीपासून काँग्रेसने सारे योग्य नियोजन करीत हा मतदारसंघ कायम राखण्याकरिता यंत्रणा राबविली आहे. दुसरीकडे भाजपमधील उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला नाही.

thieve with koyta roaming arround in New Nashik
नवीन नाशिकमध्ये कोयताधारींचा धुडगूस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
success story of IAS Vinod Kumar
निधीचा गैरवापर, भ्रष्टाचाराच्या १० प्रकरणांमध्ये ठरवले गेले दोषी, चर्चेत राहिलेले ‘ते’ आयएएस अधिकारी आहेत तरी कोण?
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…

नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे, निवडणूक जाहीर झाली तरी अद्याप भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने निवृत्त सनदी अधिकारी रतन बनसोडे (येवला, नाशिक) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा… आनंद भरोसे : उपक्रमशील तरुण चेहरा

भाजपकडून डॉ. राजेंद्र विखे (नगर) धनराज विसपुते (धुळे), हेमंत धात्रक (नाशिक) इच्छुक आहेत. राजेंद्र विखे हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू आहेत. मात्र भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे पक्षाशिवाय उमेदवाराला स्वतःची अशी भक्कम, व्यापक यंत्रणा हवी असते. त्यादृष्टीने विखे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जाते. मात्र एकाच कुटुंबात आणखी संधी भाजपकडून दिली जाईल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसे झाल्यास आजीमाजी महसूलमंत्र्यात लढत रंगू शकते. डॉ. तांबे हे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत.

हेही वाचा… राहुल चिकोडे : ध्येयवादी व्यक्तिमत्व

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु या मतदारसंघाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यातूनच आता या मतदारसंघावर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सन २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे डॉ. तांबे यांनी या मतदारसंघात प्रवेश केला आणि गेल्या तीन निवडणुकातून विजय मिळवला. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राज्य व केंद्रात सत्ता असूनही मतदारसंघ गमावला. पक्षातीलच अनेक ठिकाणचा बेबनाव त्याला कारणीभूत ठरला. विशेषतः एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्यातील वाद विकोपाला गेले होते आणि शिवसेनेने अखेरच्या टप्प्यात विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे अनुकूल परिस्थिती असूनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. आताही भाजपने मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. मतदार नोंदणीतही यंत्रणा विस्कळीतच होती.

हेही वाचा… राजेश्वर चव्हाण : एकनिष्ठ नेते

विभागातील पाचही जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी नगर जिल्ह्यातून झाली आहे. गेल्यावेळी ती नाशिक जिल्ह्यातून झाली होती. नगर जिल्ह्यातूनही सर्वाधिक नोंदणी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून झाली आहे. सध्या राज्य पातळीवर वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये युतीचे राजकारण शिजत आहे. त्यातून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार का याबद्दलची चर्चा सुरू आहे. असे असतानाही काँग्रेसच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.

पाच जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेली मतदार नोंदणी पुढीलप्रमाणे:

नगर-११६३१९

नाशिक-६६७०९

जळगाव-३३५४४

धुळे-२५५९३

नंदुरबार-१९२७९.

Story img Loader