संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे ही राज्यात असली तरी या पक्षाला राष्ट्रीय दर्जा आहे. महाराष्ट्राबाहेर खासदार, आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची देशात ताकद वाढविण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला होता. पण त्यात मर्यादित यश आले. त्यानंतर पक्षाने महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रीत केले. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून १७ वर्षे पक्ष राज्यातील सत्तेत भागीदार होता.

हेही वाचा… भाजपचे लक्ष्य बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ,’मिशन -४५’ अंतर्गत नियोजनबद्ध तयारी

राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा आदी काही नेत्यांना राष्ट्रीय राजकारणाची चांगली जाण आहे. राज्यातील नेते दिल्लीत काम करण्यास फारसे उत्सुक नसतात. राष्ट्रीय राजकारणात काम करताना भाषा ही मुख्य अडचण असते. दिल्ली किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करण्याकरता हिंदी व इंग्रजी भाषा चांगली अवगत असणे आवश्यक असते. हिंदी भाषक पटट्ट्यात काम करताना हिंदीवर प्रभुत्व लागते. जितेंद्र आव्हाड यांचे इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांवर पक्षाची बाजू मांडण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. मंत्रीपद व आमदारकी भूषविताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. आव्हाड यांच्यात असलेले गुण लक्षात घेऊनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. आता पक्षाने त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड केल्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पातळीवरील मर्यादा लक्षात घेता आव्हाड यांची पसंती साहजिकच दिल्लीऐवजी मुंबई वा ठाण्यात असेल. आव्हाड यांनी कल्याण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा पक्षात मतप्रवाह आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही आव्हाड यांच्या नावाची चर्चा झाली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु डोंबिवली, अंबरनाथ, कल्याणचा काही भाग हा आव्हाड यांच्यासाठी फारसा अनुकूल नाही. आव्हाड यांची निधर्मवादी भूमिका ही डोंबिवली व आसपासच्या भागात मान्य होणारी नाही. तसेही कल्याण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघ हे उजव्या विचारसरणीकडे वळलेले मतदारसंघ आहेत.