सोलापूर : चार दशके सत्तेच्या राजकारणात राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची अलिकडे दहा वर्षांत मोठी पिछेहाट झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे. त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याच कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढे चालविताना आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरून पित्याच्या सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा विडा उचलला आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे हे गेले महिनाभर सोलापुरात तळ ठोकून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्याचा अर्थसंकल्प तब्बल सातवेळा मांडणारे सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, लोकसभा नेता अशी अनेक उच्चपदे सांभाळली आहेत. दलित असूनही दलितपण न मिरवता किंवा कधीही गांभीर्याने पूर्णवेळ राजकारण न करता सारस्वतांच्या दरबारासह अनेक खुल्या व्यासपीठांवर वावरणारे शिंदे म्हणजे हसतमुख व्यक्तिमत्व. राजकारणात एखाद दुसरा अपवाद वगळता नेहमीच त्यांच्या यशाची कमान चढती राहिली आहे. सत्ताकारणासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, काही महत्त्वाच्या राज्यांचे प्रभारी तसेच संयुक्त राष्ट्रीय संघात भारताचे प्रतिनिधी आदी जबाबदाऱ्या त्यांनी लीलया सांभाळल्या होत्या. परंतु २०१४ नंतर नरेंद्र मोदी प्रभावामुळे देशाच्या राजकारणाचा बाज बदलला असताना त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला. यातच वाढत्या वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक थकव्यामुळे त्यांना राजकीय निवृत्तीचे वेध लागल्याचेही दिसून येते. राजकारणातून थेट निवृत्ती घेतली नसली तरी निवडणूक न लढविण्याची त्यांची भूमिका यापूर्वीच समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी स्थानिक राजकारणात स्वतःचा प्रभाव वाढवत असताना राज्यातही काँग्रेसचे कार्याध्यक्षपद, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळवून त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. २००४ पासून सलग तीनवेळा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना मधल्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः प्रणिती शिंदे याच काँग्रेसकडून लोकसभेच्या उमेदवार असतील. पक्षश्रेष्ठींनी त्यावर अंतिम औपचारिक निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Kerala Blast : “हमासला पाठिंबा दिल्यामुळे केरळमध्ये बॉम्बस्फोट”, भाजपाचा आरोप; काँग्रेस-डाव्या पक्षांवर शरसंधान

सुशीलकुमार शिंदे हे यापूर्वी १९९८ आणि १९९९ अशा सलग दोनवेळा सोलापुरातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ साली पुन्हा त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व करताना केंद्रीय ऊर्जामंत्री व गृहमंत्रिपद सांभाळले होते. मात्र ते राज्याचे मुख्यमंत्री असताना २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी उज्जला शिंदे यांचा पक्षाअंतर्गत दगाबाजीमुळे अवघ्या ५७९८ मतांच्या फरकाने निसटता; परंतु तेवढाच धक्कादायक पराभव झाला होता. त्यानंतर मोदी लाटेत २०१४ साली ते स्वतः सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यावेळी त्यांनी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्यासाठी मतदारांना भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने धार्मिक आणि जातींच्या ध्रुवीकरणातून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरविले असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा मोठा फटका बसून सुशीलकुमार शिंदे यांना विजयापासून ‘वंचित’ राहावे लागले होते.

हेही वाचा – मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ही रिंगणात

या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय समीकरणे पाहता सोलापुरात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यातील अक्कलकोट, सोलापूर शहर मध्य, मोहोळ आणि पंढरपूर हे चार विधानसभेच्या जागा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. त्यापैकी केवळ मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढ्यातून शिंदे यांना मतांची आघाडी घेणे शक्य झाले होते. प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातूनसुद्धा भाजपला ३० हजार ८२९ मतांची आघाडी मिळाली होती. सध्या एकमात्र सोलापूर शहर मध्य वगळता उर्वरीत सर्व पाच विधानसभा जागांवर भाजप (४) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (१) वर्चस्वाखाली आहेत. त्याचा विचार करता काँग्रेसला सोलापूर लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेणे सहजासहजीची गोष्ट नाही. मोठे आव्हान पेलण्याची ताकद काँग्रेसला निर्माण करताना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजपच्या विरोधात असलेल्या जनभावना प्रत्यक्ष मतपेटीतून घडवून आणावी लागणार आहे. त्यादृष्टीने सध्या आमदार प्रणिती शिंदे यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून जुन्या-नव्या सर्वांबरोबर मजबूत जाळे उभारताना राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तेवढ्याच विश्वासाने बरोबर घ्यावे लागणार आहे.