तेलंगणामध्ये राबविलेल्या शेतकरी व दलित उत्थानाच्या योजनांच्या आधारे महाराष्ट्रात पाय पसरण्याचे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांना आता मोठी खीळ बसणार आहे. मोठी ताकद लाऊन मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला सात जागा कशाबशा राखता आल्या. तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रात ‘ब’ चमू म्हणून चर्चेत असणाऱ्या ‘एमआयएम ’ आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्येही पराभवामुळे चलबिचल दिसून येत असतानाच याचा लाभ काँग्रेसला मिळवता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे.

तेलंगणातील ‘केसीआर’ यांची ताकद कशी कमी होते, हे स्पष्ट झाल्याची टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही केली. दुसऱ्या बाजूला ‘एमआयएम’ला कशाबशा गेल्या विधानसभेत जेवढ्या सात जागा होत्या तेवढ्याच राखता आल्या. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यात ओवेसी यांचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा सुरू झाल्याने ‘ब’ चमूचे अपयश काँग्रेसला उपयोगी पडू शकते, असे सांगण्यात येत आहे.

farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Chandrapur Vidhan Sabha Constituency Seat Sharing Congress Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar for Maharashtra Assembly Election 2024
तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांची खासदार धानोरकर यांच्यावर मात
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
shetkari sanghatana
शेतकरी संघटनांची ऊसदर आंदोलने यंदा थंड ! आचारसंहितेमुळे निकालानंतर लढाईची तयारी
hajari karyakarta marathi news
‘हजारी कार्यकर्ता’ यंत्रणा मोडीत?
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
pune reorganization of vidhan sabha
मतदार संघाची पुनर्रचना आणि यशाची हमी

हेही वाचा – रायगड लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा !

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरणात तेलंगणामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रभावी प्रसार केसीआर यांनी केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती हा पक्षही ‘ब’ चमूचा ‘ब’ चमू अशी टीका केली जाऊ लागली होती. हिंगाेली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी आडून – आडून खेळू नका, मैदानात या, असे आव्हान दिले होते. पण बीआरएसच्या पराभवाबरोबरच ‘एमआयएम’ चा प्रभाव वाढला नाही. उलट मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला स्वीकारल्याची चर्चा राजकीय पटलावर होऊ लागली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तयाज जलील यांनीही तेलंगणातील मुस्लिम मते काँग्रेसला गेल्याचे सांगितले. मात्र, त्याचा एमआयएमच्या जागांवर परिणाम झाला नाही. सात जागा राखता आल्या. नव्या दोन विधानसभा मतदारसंघात प्रभाव वाढला पण त्यात विजय मिळाला नाही, हे मान्य केले. तेलंगणातील सत्ताधारी बदलल्यामुळे राज्यातील काही गणिते बदलण्याची शक्यता आता पुन्हा व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये राज्य सरकार पुरेसा निधी देत नसल्याने त्यांनी ‘आम्हाला तेलंगणात जाऊ द्या’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय कार्यशैलीवर मोठे प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील योजनांच्या कार्यशैलीचे कौतुक राज्यातील नेते करू लागले. बीड, लातूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी तेलंगणात जाऊन पाहणी केली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वी नाराज असणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘केसीआर’ यांच्या कामाचे कौतुक केले होते. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पातळीवर राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या अनेक नेत्यांनी ‘तेलंगणा प्रारुपा’चे तोंड भरून कौतुक केले. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी केसीआर पाय विस्ताराला सुरुवात करतील आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. केसीआर यांनीही राज्यात काही ठिकाणी सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांवर तेलंगणातील योजनांची चित्रफीत दाखविण्याचीही व्यवस्था केली होती. तेलंगणातील पराभवामुळे तो प्रभाव निर्माण करण्यास आता अडचणी येतील असे सांगण्यात येत आहे. शेती आणि शेतकरी हा मतदार व्हावा हा ‘केसीआर’ यांचा प्रयोग ‘मराठा- ओबीसी’ वादामुळेही प्रभावहीन ठरण्याची शक्यता होतीच. तेलंगणामधील पराभवामुळे आता ‘बीआरएस’च्या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अमरावतीत भाजपपुढे आव्‍हान

तेलंगणामध्ये भाजपाने ‘केसीआर’ यांना ‘निजाम’ म्हटले होते. केसीआर आणि ‘एमआयएम’यांची आघाडीही होती. एमआयएम पक्षाचा प्रभावही आता घसरला आहे. त्यांना कशाबशा सात जागा मिळाल्या. मुस्लिम मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यात एमआयएम या पक्षाला माफक यश आले. असे करताना एमआयएम या पक्षावर असणारा ब चमू शिक्का या वेळी पुन्हा गडद झाल्याने विभागलेले मतदान काँग्रेसच्या पथ्यावर पडेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे आणि ते एमआयएमकडे वळल्याचे काही मतदारसंघात पूर्वी दिसून येत होते. आता ती बाब जर थांबली तर त्याचा फायदा मात्र काँग्रेसला होऊ शकतो, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील म्हणाले.