नागपूर : मतदानोत्तर चाचणीचे कल लक्षात घेता महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भात फारशी संघटनात्मक ताकद नसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर टाकलेला विश्वास महायुतीची कामगिरी खराब करण्यास कारणीभूत ठरला आहे, असा निष्कर्ष या पाहणीतून सहज काढता येतो.

मराठा आरक्षणामुळे ओबीसींमध्ये असलेली नाराजी, दलित व मुस्लीम समुदायांचे महाविकास आघाडीला झालेले मतदान लक्षात घेता यावेळी भाजपला म्हणजेच महायुतीला विदर्भात गेल्यावेळची कामगिरी कायम राखता येणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले. विविध वृत्तवाहिन्या व संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहज विजयी होतील. त्यांचे मताधिक्य मात्र घटेल. भाजपपेक्षा वैयक्तिक लोकप्रियतेचे बळ यामागे कारणीभूत असल्याचे दिसते. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात पराभूत होतील असा अंदाज काही वाहिन्यांनी वर्तवला आहे तर काहींनी दोन ते तीन टक्क्यांच्या फरकाने ते जिंकतील असे म्हटले आहे. ही लढत अटीतटीची झाली होती व काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आमदार पत्नी प्रतिभा यांना अनुकूल वातावरण होते. येथे कुणबी समाजाची मते निर्णायक ठरल्याचे दिसते.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
union minister nitin gadkari interview for loksatta ahead of Maharashtra Assembly Election 2024
व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

हेही वाचा – अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

वर्धेत भाजपचे रामदास तडस बाजी मारतील असे हा कल सांगतो. नव्या चिन्हावर अमर काळेंना रिंगणात उतरवण्याचा फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झालेला दिसत नाही. गडचिरोलीत काँग्रेसचे नामदेव किरसान बाजी मारतील. हा अशोक नेतेपेक्षा भाजपसाठी मोठा धक्का असेल. भंडाऱ्यात भाजपचे सुनील मेंढे पून्हा विजयी होतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसाठी हा मानहानीकारक पराभव असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विदर्भात रामटेक, यवतमाळ व बुलढाणा या तीन जागा लढवल्या होत्या. यापैकी दोन ठिकाणी त्यांचा पराभव होईल असा दावा चाचण्यांमध्ये करण्यात आला. यातील यवतमाळ व बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला तर रामटेकमध्ये शिंदेसेनेला विजयाची संधी दाखवण्यात आली आहे. असा निकाल लागला तर तो शिंदेसाठी मोठा धक्का असेलच, पण भाजपला त्याहून मोठा झटका असेल.

हेही वाचा – गडचिरोली : दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षल समर्थकास अटक

अकोल्यात मतविभाजनाचा फायदा भाजपचे अनुप धोत्रेंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे काँग्रेसच्या पराभवासाठी वंचितचे प्रकाश आंकेडकरांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अमरावतीत यावेळी भाजपकडून लढणाऱ्या नवनीत राणा विजयी होतील असे हा कल सांगतो. येथे दोन तपानंतर प्रथमच लढणाऱ्या काँग्रेससाठी व या पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.