कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या राजकारणाची ओहोटी सुरू झाली. सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दुःख एकीकडे असताना दुसरीकडे जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी संघटनेला रामराम ठोकल्याने चळवळीला धक्का बसत गेला. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना यावेळी राजू शेट्टी हे तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणाची नवी खेळी सुरू करीत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील जुना सहकारी उल्हास पाटील आणि उद्धव ठाकरे शिवसेनेतील डॉ. सुजित मिणचेकर या दोन माजी आमदारांना संघटनेत आणण्याचे कौशल्य दाखवले आहे. यामुळे शेट्टी यांची नवी खेळी कितपत फलदायी होणार याची चर्चा आहे.

शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या चळवळीचे काम सुरू केलेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उभारणी केली. त्यातून त्यांनी जिल्हा परिषद, आमदार, दोन वेळा खासदार असा राजकीय प्रवास केला. त्यांची राजकीय प्रगती होत असताना दुसरीकडे संघटनेत मतभेद वाढत गेले. शिरोळ तालुक्यातील उल्हास पाटील यांनी संघटनेला रामराम ठोकला. ते २०१४ साली शिवसेनेकडून निवडून आले. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचा त्याग करून भाजपकडून आमदारकी आणि कृषी राज्यमंत्रीपद मिळवले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी हातकणंगलेतील खंदे कार्यकर्ते शिवाजी माने यांनी फारकत घेवून जय शिवराय संघटनेची चूल बांधली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सहकारी असे बाजूला जात असताना विदर्भ -मराठवाड्यातही याहून वेगळ्या अवस्था नव्हती.

Ajit pawar big statement on RR Patil Tasgaon Assembly Election
Ajit Pawar on RR Patil: “आर. आर. पाटलांनी माझा केसानं गळा कापला, फडणवीसांनी मला…”, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
Raju Tadvi, Chopda, Raju Tadvi Chopda,
चोपड्यात ठाकरे गटाकडून दोनच दिवसांत उमेदवार बदलला, भाजपमधून आयात

हेही वाचा – चोपड्यात ठाकरे गटाकडून दोनच दिवसांत उमेदवार बदलला, भाजपमधून आयात

अलीकडेच लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीपासून दूर जात बुलढाण्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे देवेंद्र भुयार हे गेल्या विधानसभेला स्वाभिमानीकडून निवडून आले. नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. स्वाभिमानीला असे अनेक धक्के बसू लागले. दुसरीकडे, शेट्टी हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्या राजकारणाची उतरंड सुरू झाल्याचे चित्र आहे. आता शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणाची नवी खेळी (इनिंग) सुरू केली आहे. त्याची सुरुवात करत असतानाच त्यांनी जुना मित्र उल्हास पाटील आणि शेजारच्या हातकणंगले राखीव मतदारसंघातील उद्धव ठाकरे शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेले डॉ. सुजित मिणचेकर या दोघांना सोबत घेऊन बेरजेच्या राजकारणाचा नव्या अध्याय सोमवारी रात्री सुरू केला.

हेही वाचा – उमेदवार सीमोल्लंघनाचा भाजपचा प्रयोग

शिरोळ तालुक्यात शेट्टी यांना मानणारा जैन समाज आणि उल्हास पाटील यांची मराठा मते यांचे गणित घालून विजयाचा दावा केला जात आहे. हातकणंगलेत शेट्टी यांची जैन मते आणि मिणचेकर यांच्यासोबत असलेला बौद्ध समाज यांची बेरीज घालून विजयाचे आडाखे बांधले जात आहेत. शेट्टी यांनी दिवाळीच्या सुरुवातीलाच नवा धमाका उडवला आहे. तो विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात कसा वाजणार याकडे आता लक्ष लागले आहे.