मोहनीराज लहाडे

नगरःभाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे नगर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी प्रथमच जिल्ह्यात आले होते. त्यांनी यापूर्वी नगरचे धावते दौरे केले मात्र जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा प्रथमच घेतला. शिर्डी येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यापूर्वी त्यांचा एकदा दौरा रद्द झाला होता. जिल्ह्यातील संघटनात्मक कामाची परिस्थिती पाहता त्यांना झाडाझडतीच घ्यावी लागली. आता ते पुन्हा २१ एप्रिलला नगरमध्ये येत आहेत. त्यावेळी पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. तोपर्यंत सुधारणा करण्याची मुदत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांनी नगरऐवजी शिर्डीत बैठक घेतली. शिर्डी विधानसभा मतदारसंघ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा आहे. भाजपमध्ये सध्या विखे यांना बळ देण्याचे काम सुरू आहे. पक्षातील त्यांचे महत्त्वही वाढते आहे. त्याबरोबरच पक्षात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी शिर्डीत बैठक घेऊन सुचकता दाखवली. कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी गटबाजी, पक्षांतर्गत हेवेदावे लक्षात घेता सुधारणांबाबत साशंकताच व्यक्त केली जाते.

हेही वाचा >>>चंद्रकांत पाटील वक्तव्यावरून नाराज पक्षश्रेष्ठींचा थेट हस्तक्षेप?

मात्र पक्षातील प्रमुख नेते मंत्री विखे व आमदार राम शिंदे त्याचवेळी आयोध्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते. केवळ हे दोघेच नव्हे तर प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीस आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड आदींचीही अनुपस्थिती होती. बाजार समित्यांच्या निवडणुकांचे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले होते. आमदार बबनराव पाचपुतेही अनुपस्थित होते. मात्र त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते उपस्थित होते. आमदार पाचपुते यांनी आता चिरंजीवांना पुन्हा पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विक्रम पाचपुते भाजपच्या बैठकांना हजेरी लावू लागले आहेत.

संघटनात्मक कामात बुथकेंद्र, शक्तीकेंद्र, बूथ कमिट्या, बूथरचना, सरल ॲप, मोदी ॲप, गव्हर्मेंट ॲपचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवणे, त्याचा प्रचार व प्रसार, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. परंतु सद्यपरिस्थिती पाहता प्रदेशाध्यक्षांवर नाराज होण्याची वेळ आली. त्यातूनच त्यांनी संघटनात्मक कामात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केल्याचे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी सांगतात. खासदार डॉ. सुजय विखे यांनीही ‘आपले पितळ उघडे पडले आहे’, असे सूचक वक्तव्य करत परिस्थिती निदर्शनास आणून दिली. विखे समर्थकांसाठी ही संधी ठरु शकते.

हेही वाचा >>>चौकशीच्या फेऱ्यातही कोल्हापूर जिल्हा बँकेची आर्थिक प्रगती; सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बूथरचनेला महत्त्व देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. परंतु त्याच कामात जिल्हा मागे पडल्याचे प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात आले. राहुरी, शेवगावमध्ये अद्याप तालुकाध्यक्षांच्याही नियुक्त्या झालेल्या नाहीत. नव्या-जुन्यांच्या संघर्षात त्या रखडल्या आहेत. तुम्हाला जर नियुक्ती करणे शक्य नसेल तर मी दोन दिवसात नियुक्ती करतो, अशा शब्दात प्रदेशाध्यक्षांनी सुनावले. बैठकीला बूथरचनेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक होती. परंतु अनेकांनी बैठकीचा निरोपच मिळाला नसल्याच्या तक्रारी केल्या.

पक्षाचे जिल्ह्यात तीन अध्यक्ष आहेत. नगर ग्रामीणचे उत्तर व दक्षिण असे दोन व नगर शहर असे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष व कार्यकारणीची मुदत गेल्या नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली. त्यांना मुदतवाढ मिळाली की नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त होणार, याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. प्रदेशाध्यक्षांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये, फेब्रुवारीपर्यंत नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त होतील अशी ग्वाही दिली होती. ती लक्षात घेऊन पक्षातील अनेकांनी जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्यासाठी, जोर लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातून पदाधिकारी बदलाचे वारे जिल्हा भाजपमध्ये वाहू लागले आहेत. नवे पदाधिकारी नियुक्त करताना मंत्री विखे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातून नव्या-जुन्या कार्यकर्त्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. तो लक्षात घेऊन या नियुक्त्या लांबणीवर पडतात की निवडणुकांपूर्वी पदाधिकारी बदलणार याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

पक्षाचे तीन विधानसभा सदस्य आहेत. हे तिघेही इतर पक्षातून आलेले आहेत. त्यांचा व पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समन्वयासाठी विधानसभा मतदारसंघात गुजरातच्या धर्तीवर संयोजक नियुक्त केले केला जाणार आहेत. या संयोजकांमुळे नव्या-जुन्यांचा समन्वय कसा साधला जातो, याचीही पक्षात उत्सुकता आहे.