राज्यातील रिक्त असलेल्या पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका होणार की नाही, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत कोणत्याच राजकीय पक्षाला या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुका नको असून, निवडणूक आयोकडून फारशा हालचाली नसल्याने पोटनिवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे मतदारसंघातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्चला तर चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाले. लोकप्रतिनिधी कायद्यातील १५१ (ए) कलमानुसार, लोकप्रतिनिधीचे निधन अथवा अपात्र ठरल्याने जागा रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक घेऊन ती भरणे आवश्यक असते. या कलमात पोटनिवडणूक टाळण्यासाठी दोन अपवाद करण्यात आले आहेत. यानुसार लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा कमी कालावधी असणे किंवा पोटनिवडणूक घेण्यास परिस्थिती अनुकूल नसणे.
हेही वाचा – गोळीबारानंतर हिंगोलीमधील राजकारणातील गुन्हेगारीकरणाचे पदर उघडकीस
पुण्याची जागा २९ मार्चला रिक्त झाल्याने सहा महिन्यांचा कालावधी म्हणजे २९ सप्टेंबरपर्यंत पोटनिवडणूक होणे आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये डिसेंबरपर्यंत मुदत आहे. पुण्याची जागा मार्चअखेर रिक्त झाल्याने मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण तेव्हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. निवडणूक आयोग सणासुदीच्या काळात किंवा पावसात निवडणूक घेण्याचे टाळते. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अजून काही दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुण्यात पोटनिवडणूक घ्यायची असल्यास आताच निवडणूक आयोगाला सारी तयारी करावी लागेल. तसेच सर्व निवडणूक केंद्रे पावसापासून बचाव करतील अशा पद्धतीने निवडावी लागतील. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत असून, सणासुदीच्या काळात शक्यतो निवडणूक घेतली जात नाही. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला महिनाभराचा कालावधी जातो. कारण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. आधी सात दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिले जातात. त्यानंतर छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असते.
पुण्याची पोटनिवडणूक टाळण्यावर सत्ताधारी भाजपचाच भर राहिला आहे. कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केल्याने वातावरण बदलले. त्यातच उमेदवाराची निवड करताना परत भाजपची डोकेदुखी वाढू शकते. ‘पुण्याची पोटनिवडणूक भाजपलाच नको आहे‘, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार व गेल्या निवडणुकीतील उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केली. चंद्रपूरमध्ये पराभव समोर दिसत असल्याने भाजप पोटनिवडणूक घेण्याचे धाडस करणार नाही, असे मत काँग्रेसच्या आमदार प्रतीभा धानोरकर यांनी व्यक्त केले. पुण्यात पोटनिवडणूक झाल्यास आमची तयारी आहे, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपा पक्षात मोठी उलथापालथ, पक्षातील बड्या नेत्याने दिला राजीनामा!
लोकसभेची मुदत केव्हा संपते ?
१७व्या लोकसभेची मुदत ही १२ जून २०२४ रोजी संपुष्टात येईल. लोकसभा निवडणुकीची तयारी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा आणि तारखा जाहीर होतील. यामुळे दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या तरी नवीन खासदाराला केवळ सहा महिन्यांचाच कालावधी मिळू शकेल. एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक टाळता येते. चंद्रपूरचे खासदार धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाले तर लोकसभेची मुदत १२ जून रोजी संपत आहे. यामुळे एक वर्षापेक्षा १४ दिवस अधिक होत आहेत.