संतोष प्रधान

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत कोणती भूमिका घेतात यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना बारामतीसह राष्ट्रवादीच्या ताब्यातील चारही मतदारसंघातील निवडणूक लढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. बारामतीचा गड शरद पवार की अजित पवार यापैकी कोण कायम राखते याचीच साऱ्यांना आता उत्सुकता असेल.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा लढण्याची घोषणा केली. याशिवाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडील काही जागाही लढविण्याचे सुतोवाच केले. अजित पवार यांनी प्रथमच बारामती लोकसभा लढण्याचे जाहीर करून काका शरद पवार व चुलत बहिण सुप्रिया सुळे यांना राजकीय आव्हान दिले आहे. बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण आहे. पण गेल्या काही वर्षांत अजित पवार यांनी त्यांचे राजकीय प्रस्थ निर्माण केले आहे. यामुळेच बारामतीमधील लढत ही चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा… नाशिक महानगरपालिकेत प्रशासन-राजकीय संघर्षाचा नवीन अंक, माजी महापौरांचीही उडी

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार पत्नी सूनेत्रा अथवा पुत्र पार्थ यांना रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबियांमध्येच सामना झाला पाहिजे, असा भाजपचा कटाक्ष असेल. अजित पवार हे भाजपला शरण गेल्याने आता भाजपच्या कलानेच त्यांना सारे घ्यावे लागेल. अजित पवार यांच्या बारामती लढण्याच्या घोषणेने राजकीय समीकरणेही बदलणार आहेत.

हेही वाचा… स्नेहमेळाव्यातून खासदार निंबाळकरांची मोहिते-पाटील यांच्यावर कुरघोडी !

बारामतीमध्ये आजही शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पण बारामती मतदारसंघात येणाऱया शहरी भागात व विशेषतः तरुण वर्गात मोदींचे जास्त आकर्षण आहे. २०१४च्या मोदी लाटेत पवार कुटुंबिय एकत्र असतानाही सुप्रिया सुळे यांना मोठा फटका बसला होता. त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे एक लाखांच्या मताधिक्याने विजयी होतात. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना बारामतीमधील अजित पवार यांचा आधार होता. आता अजित पवार विरोधात गेल्याने सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांना मैदानात उतरावे लागेल.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, साताऱ्यात श्रीनिवास पाटील, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटासोबत आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजितदादांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळेच सातारा, शिरूर आणि बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल.

हेही वाचा… Maharashtra News Live : पुण्यात मनसेकडून इंग्रजी पाट्यांची तोडफोड, अनेक दुकानांवर दगडफेक

सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार – सुप्रिया सुळे

बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या अजित पवार यांच्या घोषणेबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, लोकशाहीत सर्वांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार उभा करू शकतो. शेवटी कोणाला निवडून द्यायचे याचा निर्णय मतदार घेत असतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Story img Loader