भाईंदर : जैन, गुजराती, मारवाडी समाजातील बहुसंख्य मतदारांचा भरणा असल्यामुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या दहा वर्षात प्रस्थापित होऊ लागलेल्या मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन यांच्या मदतीनेच भाजपवर मात करण्याची व्युहरचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आखली जात आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना भाजपच्या अंतर्गत बैठकांना उपस्थित रहाणाऱ्या जैन गेल्या काही दिवसांपासून अचानक शिंदेसेनेच्या बैठकांमध्ये दर्शन देऊ लागल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार नरेंद्र मेहता या मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार या न्यायाने जैन यांच्यासाठी मीरा-भाईदर मतदारसंघावर दावा करत शिंदेसेनेने आतापासूनच भाजप आणि मेहता यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

आणखी वाचा-Shakti Bill Update: बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा; बलात्काऱ्यांना कडक शिक्षा देणारा कायदा का रखडला?

२०१४ नंतर देशात बदललेल्या राजकीय समिकरणांचा परिणाम मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघावरही दिसून आला. सुरुवातीच्या काळात हा मतदारसंघ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. २००९ मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गिल्बर्ट मेन्डोसा हे आमदार म्हणून निवडून आले होते. वर्षानुवर्ष काँग्रेसकडून विधान परिषदेवर वर्णी लावणारे मुज्जफर हुसेन हे देखील या भागातील राजकीय क्षेत्रात स्वत:चे प्रस्थ राखून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तत्कालिन पालकमंत्री गणेश नाईक यांचाही या शहरांमध्ये प्रभाव राहीला होता. २०१४ नंतर या शहरातील राजकीय परिस्थिती बदलली. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत वसलेल्या या शहरांमध्ये जैन, गुजराती, मारवाडी समाजाची मोठी मते आहेत. काही वर्षापुर्वी या शहरांमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि तेव्हाची एकसंघ शिवसेना एकमेकांविरोधात निवडणूक लढली होती. महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. मात्र भाजपने महापालिकेवर पहिल्यांदा सत्ता मिळवत शिवसेनेचा धुव्वा उडविला होता. त्यावेळी जैन समाजातील मुनींनी ऐनवेळी केलेल्या आवाहनाचा आम्हाला फटका बसल्याची कबुली शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचा हा बालेकिल्ला गीता जैन यांच्या माध्यमातून शिंदेसेनेकडे कसा आणता येईल याची पद्धतशीर व्युहरचना मुख्यमंत्र्यांच्या गोटात आखली जात असून यामुळे भाजपच्या गोटात कमालिची अस्वस्थता पसरली आहे.

आणखी वाचा-तहसील कार्यालयाच्या वादात शिंदे-अजितदादा गटात जुंपली, भाजपचे ‘नरो वा कुंजरो’

भाजपच्या बैठकीत मेहता आक्रमक

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षाच्या नेत्यांनी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईदरमध्ये बैठकांचा सपाटा लावला होता. या बैठकांना अपक्ष आमदार गीता जैन आवर्जून उपस्थित असायच्या. जैन या भाजपच्या महापौर म्हणून एकेकाळी कार्यरत होत्या. सध्या आमदार असलेल्या जैन यांचा विधानसभेसाठी पुन्हा आग्रह आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जैन यांनी सुरुवातीच्या काळात त्या सरकारला पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर बराच काळ त्या विधानसभेत शिवसेनेच्या सहयोगी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. भाजपच्या नेत्यांना जैन यांचे वागणे फारसे रुचलेले नाही. ठाणे, पालघर जिल्ह्याची जबाबदारी पहाणारे भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी म्हणूनच मीरा-भाईदर शहराचे पक्षाचे अध्यक्षपद जैन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नरेंद्र मेहता यांच्याकडे सोपविले आहे. या नियुक्तीमुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस टोकाला पोहचल्याचे लक्षात येताच शिंदे सेनेने आमदार जैन यांना आपल्या गोटात घेतले असून त्यांच्यामार्फत या मतदारसंघावरही दावा केला आहे.

आणखी वाचा-Badlapur : बदलापूरमधली लैंगिक अत्याचाराची घटना आणि महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ

शिंदेसेनेचा प्रबळ दावा

मिरा भाईंदर शहराचा निम्मा भाग हा १४५ विधानसभा क्षेत्रात येतो. यात काशिमीरा येथील पेणकर पाडा पासून उत्तन परिसर असा मुख्य मार्गाच्या पलीकडचा संपूर्ण परिसर आहे. मागील दहा वर्षांपासून या शहरातील महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे येथील विधानसभा क्षेत्रावर भाजपकडून प्रबळपणे दावा करण्यात येतो. जैन या विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊन शिंदेसेनेने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपने शहरात नुकत्याच घेतलेल्या एका मेळाव्यात या मतदारसंघातून नरेंद्र मेहता हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली. असे असले विद्यमान आमदार जैन यांना सोबत घेऊन जर शिंदेसेनेने या मतदारसंघावर दावा केला तर काय करायचे या चिंतेत सध्या भाजप नेते दिसत आहेत. शिंदेसेनेच्या नेत्यांनीही आमदार जैन यांना यापुढे भाजपच्या अंतर्गत बैठकांना जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. जैन या शिंदेसेनेच्या सहयोगी सदस्य आहेत, त्यामुळे त्यांनाच ही उमेदवारी पक्षाकडून द्यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या गोटातून पुढे आणला जात आहे. त्यामुळे पक्षाच्या बालेकिल्ल्यातच भाजपची अवस्था कठीण होऊन बसली आहे.

Story img Loader