राजेश्वर ठाकरे

जलंभ(बुलढाणा) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रतील १३ व्या दिवशी अनोखे दृश्य बघावयास मिळाले, राहुल गांधी पदयात्रा करीत होते आणि महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसह इतर महिला नेत्या वाहनातून यात्रा करीत होत्या. कन्याकुमारीहुन निघालेल्या राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेचा आज ७२ दिवस होता.काल त्यांची शेगावला प्रचंड जाहीर सभा झाली.गजानन दादा पाटील मार्केट, शेगाव येथून शनिवारी यात्रेला प्रारंभ झाला.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती असल्याने आज मोठ्या संख्येने महिला यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेला प्रारंभ झाल्यावर राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्या मागे प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे, खासदार रजनी पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नगमा, सुनीता गावंडे आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी राहुल यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी झाल्या. सुरूवातीला सुमारे ५ ते ७ मिनिटे चालल्यानंतर सव्वालाखे व यांच्या नेतृत्वाखालील महिला पदाधिकारी माध्यम प्रतिनिधीसाठी असलेल्या खुल्या वाहनात बसल्या.

हेही वाचा: सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय

दोन्ही बाजूने सोयाबीन, तूर पीक असलेले शेत आणि अरुंद एक पदरी रस्त्यावर राहुल गांधी त्याच्या नेहमीच्या गतीने चालत होते. शेगाव ते जलम (जि. बुलडाणा) असा प्रवास होता. चहापान साठी सकाळी ८.३० वाजता यात्रा थांबली, तेव्हा सर्व महिला राहुल गांधी यांच्याकडे जाण्यास वाहनातून खाली उतरल्या. एकीकडे पक्षाचे सर्व प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या सोबत पदयात्रा करीत असताना पक्षातील महिला नेत्यांची नावापुरती पदयात्रा व नंतर वाहनातून प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात संध्या सव्वालाखे यांना विचारले असता, त्यांनी त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने आणि आमचे वाहन खूप मागे असल्याने मीडिया वाहनात बसल्याचे सांगितले, मात्र इतर पदाधिकारी बाबत त्या काही सांगू शकल्या नाहीत.