यवतमाळ – गेल्या दशकात जिल्हा काबीज केलेल्या भाजपला यावेळी विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्व जागा राखता आल्या नाहीत. दोन जागांवर भाजप उमेदवार पराभूत झाले. येथे काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने आपले खाते उघडले तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची स्थिती जैसे थे राहिली.

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांपैकी यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी व उमरखेड या पाच मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे आमदार होते. यावेळी मात्र यवतमाळ आणि वणी या दोन जागांवर भाजपचे गणित हुकले. त्यासाठी जातीय समीकरणे आणि स्थानिक प्रश्न कारणीभूत ठरले. यवतमाळात भाजपचे उमदेवार मदन येरावार यांच्याबद्दलचा रोष मतांमधून व्यक्त झाला. शहरात वाढलेली गुन्हेगारी, शहराची दयनीय आणि बकाल अवस्था, अमृत पाणी पुरवठा योजना, चाळणी झालेले रस्ते हे मुद्दे भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरले. नागरिकांमध्ये पक्षाबद्दल रोष असण्यापेक्षा काही व्यक्तींबद्दल असलेला रोष भाजपच्या अंगलट आल्याचे सांगण्यात येते. येथे भाजपने उमेदवार बदलाचा प्रयोग केला असता तर, निकाल कदाचित वेगळा असता, असा सूर आता पक्षात आहे. मात्र भाजपने मतदारांना गृहीत धरून ही निवडणूक लढल्याने यवतमाळची निवडणूक यावेळी जनेतेने हातात घेतल्याचे चित्र होते. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असताना यवतमाळ जिल्हा मुख्यालयातून मात्र नागरिकांनी भाजपला बाजूला सारून काँग्रेसला साथ दिली.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचा – ठाणे, कोकण: कोकण ‘किनाऱ्या’वर लाट

वणी येथे निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप कार्यकर्त्यांच्या वादात एकाने कुणबी समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने येथील निवडणुकीचा नूरच पालटला. शिवाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वणी येथे प्रचारासाठी आले असताना हेलीपॅडवर त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी हा प्रकार कॅश करत प्रशासनाला धारेवर धरले. बॅग तपासणी प्रकरणाचा फायदा येथे महाविकास आघाडीला झाला. या मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाची संख्या लक्षणीय आहे. भाजपने यावेळीसुद्धा या समाजाच्या मतविभाजनाचा प्रयत्न केला. मात्र समाजाबद्दलचे वक्तव्य येथे भाजपला भोवले. मतांचे विभाजन अपेक्षित संख्येत न झाल्याने ही जागा अखेर महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर या निमित्ताने शिवसेना उबाठाने जिल्ह्यात एक आमदार देवून खाते उघडले. संजय देरकर हे अनेक वेळा निवडणूक लढले मात्र प्रत्येकवेळी त्यांना अपयश आले. अनेकदा ते मतविभाजनासाठी कारणीभूत ठरले. यावेळी मात्र भाजपच्या चुकांमुळे त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली.

पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे उमेदवार इंद्रनील नाईक जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. येथे शरद पवार यांनी येथे मराठा समाजाचा उमेदवार देवून नाईक कुटुंबीयास आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र इंद्रनील नाईक एकतर्फी निवडून आले. पुसदमध्ये वंचितच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बरोबरीने मते घेतली. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार येथे अपेक्षेपेक्षा कमकुवत ठरला. इंद्रनील नाईक यांना मिळालेल्या मताधिक्याने पुसदवर नाईक कुटुंबियांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

दिग्रसमध्ये विरोधात कोणालाही उतरविले तर शिवसेनेचे संजय राठोड यांना पराभूत करणे शक्य नाही, हेही आजच्या निकालाने स्पष्ट केले. येथे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी तुल्यबळ लढत दिली. मात्र हा बंजाराबहुल मतदारसंघ असल्याने जातीय समीकरणे वरचढ ठरली. या निवडणुकीने माणिकराव ठाकरे यांचा पुढील राजकीय प्रवास प्रभावित होण्याची शक्यता आहे. संजय राठोड हे आता जिल्ह्यातील सर्वाधिक पाचवेळा सलग निवडून आलेले आमदार ठरले आहेत. ते पाचव्यांदा विधानसभेत गेले असून चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी

उमरखेडमध्ये भाजपने नवखा उमेदवार दिला आणि येथे काँग्रेस तुल्यबळ असताना भाजप निवडून आल्याने राजकीय जाणकारांनाही धक्का बसला. आर्णी येथे भाजपने संदीप धूर्वे यांना उमेदवारी नाकारून ऐन वेळी माजी आमदार राजू तोडसाम यांना पक्षात घेवून उमेदवारी दिल्याने आर्णीचा निकाल भाजपला पोषक असा लागला. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने असतानाही येथे काँग्रेसला मतदान खेचता आले नाही. राळेगावचा निकालही अटीतटीचा लागला. भाजप येथे अगदी काठावर पास झाला. २०१९ पासूनच येथे भाजप माघारला होता. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला. काँग्रेसचे वसंत पूरके यांनी अखेरपर्यंत काट्याची टक्कर दिली. मात्र काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवरील रोषाचा फटका पुरके यांना बसला आणि हातात आलेली जागा भाजपला गेली. महाराष्ट्रात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असताना यवतमाळात भाजपचे संख्याबळ घटल्याने असे का झाले, यावर भाजपकडून चिंतन अपेक्षित आहे.

Story img Loader