मुंबई : लोकसभा निवडणुकीत संविधान आणि देश वाचविण्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्रणी भूमिका निभावली होती. आजवर देशाला नवनवीन योजना, संकल्पनांचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या या राज्यात महायुतीने राजकीय नीतीमत्ता धुळीस मिळविली असून निवडणुका कशा नसाव्यात, याचा दाखलाच हे सरकार देशासमोर देत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सुजाण आणि सजग मतदार या निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या राजकारणाची पुढची दशा आणि दिशा निश्चित करेल, असा विश्वास ‘भारत जोडो अभियाना’चे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

‘भारत जोडो अभिनायन’मधील सर्व संघटनांनी राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून १४५ जागांवर लक्ष्य केंद्रीत करून निवडणुकीचे काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार फाहद अहमद यांना ‘भारत जोडो अभियान’ने पाठिंबा दिला आहे. यावेळी यादव यांच्यासह अभियानाचे राष्ट्रीय सचिव संजय गोपाळ, राज्य समन्वयक उल्का महाजन आणि फाहद अहमद यांनी माध्यमांशी संवाद साधला.

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Raigad, Dilip Bhoir expelled from BJP, Dilip Bhoir,
रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
republican factions mahavikas aghadi
‘मविआ’ला साथ देण्याचा रिपब्लिकन गटांचा निर्धार
constitution of india loksatta article
संविधानभान : अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधित्व

हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

‘भारत जोडो अभियाना’ने लोकसभा निवडणुकीत राज्यातील २३ मतदारसंघात काम केले होते. त्यापैकी तब्बल १८ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. आता विधानसभेत १४५ मतदार संघात आमचे काम सुरू असून महाविकास आघाडीमधील घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे नियोजन, प्रचार रणनीती याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.