उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्नाटकमधील प्रचाराची सुरुवात म्हैसूर विभागातील मंड्यापासून झाली. त्यांनी कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये असलेल्या घट्ट भावनिक नात्याची आठवण मंड्यामधील प्रचारसभेत करून दिली. ‘त्रेतायुगापासून आपले एकमेकांशी दृढसंबंध आहेत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या वनवासाच्या काळात त्यांचे अभिन्न सहकारी श्री हनुमान यांचा जन्म इथल्याच कर्नाटकच्या भूमीमध्ये झाला होता. श्रीराम आणि हनुमान कधीही वेगळे होऊ शकत नाहीत. जगात कुठेही रामाचे मंदिर असेल तिथे हनुमानाचे मंदिर असणारच’, असे योगी जाहीरसभेत म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपने योगींवर धर्माच्या आधारावर मतदारांना आकर्षित करण्याची प्रमुख जबाबदारी सोपवली असल्याचे दिसते. श्रीराम आणि हनुमान यांचा उल्लेख करून योगींनी दक्षिण भारताला उत्तर भारतातील प्रमुख श्रद्धास्थानाशी जोडून घेतले आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आदी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे कर्नाटकमध्ये सुरू झाले असले तरी, या नेत्यांनी धर्माच्या मुद्द्यापेक्षा काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या काळाची आठवण करून देत मतदारांमध्ये काँग्रेसबद्दल भीती निर्माण करण्यावर अधिक भर दिला आहे. योगींनी मात्र दक्षिण कर्नाटकातून धर्माच्या मुद्द्याला हात घातला आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

हेही वाचा – बाजार समितीसाठी अशोक चव्हाण यांचा दोन आठवडे नांदेडमध्ये मुक्काम

वोक्ललिग समाजाची मते हेही योगींनी मंड्याची निवड करण्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जाते. म्हैसूर, मंड्या आदी दक्षिण कर्नाटकामध्ये प्रामुख्याने वोक्कलिग समाजाचे प्रभुत्व असून तिथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये थेट लढत होते. हा संपूर्ण पट्टा जनता दलाचा बालेकिल्ला मानला जातो. इथे भाजपला पकड मिळवता आलेली नाही. यावेळी कर्नाटकमधील सत्ता कायम ठेवायची असेल तर वोक्कलिग समाजाचा पाठिंबाही तितकाच गरजेचा आहे. त्यामुळे वोक्कलिग समाजाशी भावनिक नाते निर्माण करण्याची जबाबदारी योगी आदित्यनाथ यांच्यावर येऊन पडली आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये विविध समाजांच्या मठांना महत्त्व असते. कर्नाटकमध्ये आदिचुंचनगिरी मठ वोक्कलिग समाजासाठी श्रद्धास्थान आहे. योगींनी मंड्यातील प्रचारसभेत गोरखनाथ मठाची नाथ संप्रदायाची परंपरा आणि आदिचुंचनगिरी मठ यांच्यातील प्राचीन नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला. योगी हे गोरखनाथ मठाचे मठाधिपती आहेत. मंड्या जिल्ह्यातील नागमंगलमध्ये आदिचुंचनगिरी मठ आहे. त्याचा उल्लेख करत, आदिचुंचनगिरी मठ इथेच आहे, भैरवेश्वर स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत. भगवान श्री मंजुनाथ आणि भैरवेश्वर स्वामी इथे एकत्र प्रकट होतात. त्यामुळे कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील नातेसंबंधही प्राचीन आहेत, असे योगी भाषणात म्हणाले.

हेही वाचा – ड्रायपोर्टवरून कोल्हापूर आणि सांगलीच्या खासदारांमध्ये चढाओढ

योगींनी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना दिल्या गेलेल्या चार टक्के आरक्षणाचा विरोध केला. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतर्गत फाळणी होऊ दिली जाणार नाही, असे योगी म्हणाले. कर्नाटकमधील भाजप सरकारने मुस्लिमांचे ४ टक्के आरक्षण रद्द करून लिंगायत व वोक्कलिग या दोन्ही प्रभावी समाजांच्या आरक्षणामध्ये वाढ केली आहे. बी. एस. येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई या दोन्ही लिंगायत नेत्यांमुळे भाजपला लिंगायत मतांची शाश्वती असली तरी वोक्कलिग मते मिळवण्यासाठी भाजपला अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत.