डाव्या चळवळीकडे युवक नेतृत्वाचा अभाव असल्याचे चित्र ठळक बनत चालले असतानाच्या काळामध्ये कोल्हापुरातील गिरीश फोंडे नावाचे तरुण नेतृत्व हे आशेचे किरण ठरले आहेत. राजकारणाची किंवा चळवळीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या गिरीश यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र अशा दोन विषयात एम.ए. केल्यानंतर सध्या ते राज्यशास्त्र विषयातून पीएच.डी. करत आहेत. महाविद्यालयीनदशेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे १२ वर्षे काम करत राज्य युवा सचिव बनले.

हेही वाचा- जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांकडे आता लक्ष

loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Uddhav Thackeray campaign aggressively against 40 rebel MLAs and hold meetings in Bhiwandi Rural
फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?

याचवेळी गोविंद पानसरे यांच्या प्रभावाने मार्क्सवादाकडे ओढा वाढला. शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शिक्षकांची संघटना काढून शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात महापौर व नगरसेवकांविरोधात आंदोलन केले. परिणाम नोकरीतून गच्छंती. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन या संघटनांचे काम करत देश पातळीवर नेतृत्व केले. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक युथ संघटनेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी परिषदा, जागतिक विद्यार्थी युवक महोत्सव आयोजित करत २१ देशांमध्ये प्रवास केला. तेथील राजकीय सामाजिक नेतृत्वाशी मैत्र जोडले. यातून महाराष्ट्रातील डाव्या चळवळीला एक अभ्यासू, आक्रमक नेतृत्व मिळाले.

हेही वाचा- नितीन रोंघे : विदर्भ चळवळीतील अभ्यासू नेतृत्व

वंचित, उपेक्षित यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी सतत संघर्ष केला. कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाविरोधातील शेतकऱ्यांचा लढा, शेतकऱ्यांचा पहिला कर्ज माफी लढा तसेच विश्वशांती महायज्ञ, शंकराचार्य, अंतर्गत रस्ते टोल विरोध, भोंदू तोडकर महाराज विरोधातील आंदोलने त्यांनी केली. डॉ. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्यासोबत काम केल्याने चळवळ कशी हाताळायची याचे बाळकडू मिळाले. महापूर, पश्चिम घाट बचाव, पंचगंगा नदी प्रदूषण अशा विविध पर्यावरणीय चळवळीत कार्यरत असणारे हे तरुण नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी झगडताना दिसते. देशातील युवकांच्या आंदोलनामध्ये क्रियाशील सहभाग नोंदवताना दुसरीकडे प्रबोधनाच्या छोट्या छोट्या पुस्तकांचे लेखन करत वर्तमानपत्र, मासिके यात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लेखन करण्याचा वसा जोपासून आहेत. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात महिलांना संघटित करत ५० गावांमध्ये दारूबंदी घडवली. जातीअंतासाठी आंतरजातीय धर्मीय विवाह चळवळ २००६ मध्ये सुरू करून शेकडो जोडप्यांचे विवाह घडवून आणले.

महाराष्ट्रातील बेरोजगारांचे लढे उभे केले. गेल्या दशकभरात राज्य, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य नोकर भरतीचे प्रश्न घेऊन तरुणांना संघटित करून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये हजारोंचे मोर्चे काढले. कार्याची दखल घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्य कौन्सिलवर निवड केली आहे. शिवाजी विद्यापीठातील शुल्क वाढ, प्रलंबित परीक्षा, बोगस शैक्षणिक संस्था आदी प्रश्नात विद्यार्थ्यांचे संघर्षरत हक्काचे नाव म्हणजे गिरीश फोंडे. आंदोलनांशी गाठ मारली असल्याने कितीकदा पोलीस कोठडीमध्ये रात्री काढाव्या लागल्या आणि किती गुन्हे दाखल झाले याची नोंद करायचे त्यांनी सोडून दिले आहे.