राम भाकरे
नागपूर : महिलांसाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक क्षेत्रात क्रियाशील असणाऱ्या युवा कार्यकर्त्या पूजा मानमोडे यांच्याकडे राजकारणातील युवा नेतृत्व म्हणून बघितले जाते. निश्चित ध्येय ठेवून या क्षेत्रात काम करणाऱ्या युवतींचाही कल या वाढला आहे. पूजा मानमोडे या याच चौकटीत मोडणाऱ्या युवा कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.
महिलांसाठी विविध उपक्रम राबवताना समाजातील दुर्लक्षित घटकांना कसा आधार मिळेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. वडील सहकार व राजकीय क्षेत्रात दीर्घ काळ कार्यरत असल्याने पूजा यांना सुरुवाततीपासूनच सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. ही आवड जपताना त्यांनी सामाजिक क्षेत्र निवडले. महाविद्यालयीन जीवनातच ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनची स्थापना करून सामाजिक कार्यात पाऊल टाकले. सिग्नलवर भीक मागणारी मुले, तृतीयपंथी, कष्टकरी महिला यांच्यासाठी त्यांनी काम सुरू केले.
हेही वाचा: गिरीश फोंडे – सामान्यांसाठी संघर्ष
तृतीयपंथीयांसाठी फॅशन शो आयोजित केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षांना राखी बांधण्याचा उपक्रम राबवला. लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. निराधार भिक्षेकऱ्यांना दिवाळीचे साहित्य देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी माणुसकीचे आधार केंद्र सुरू केले. आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा प्रकल्पात जाऊन त्यांना आकाशदिवे, मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिले.
हेही वाचा: नितीन रोंघे : विदर्भ चळवळीतील अभ्यासू नेतृत्व
भिक्षेकऱ्यांनी तयार केलेल्या वस्तू विविध प्रदर्शनांमध्ये गेल्या आणि त्यातून मिळालेले उत्पन्नही त्यांच्या वाट्याला आले. वडिलांकडून राजकारणाचा वसा पूजा यांना मिळाला. त्यांचा राजकीय प्रवास विविध पक्षातून शिवसेनेत स्थिरावला असला तरी पूजा यांनी मात्र काँग्रेसची कास धरली आहे. त्या या पक्षाच्या सक्रिय युवा कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहे. त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान शेगाव येथे राहुल गांधी यांची भेट घेतली होती.